केरळमध्ये मंदिरात फटाक्यांची आतषबाजी करताना मोठी दुर्घटना, १५० हून अधिक जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 08:55 AM2024-10-29T08:55:04+5:302024-10-29T09:13:11+5:30
Neeleswaram Firecracker Accident: केरळमधील कासरगोड जिल्ह्यामध्ये मंदिरात फटाक्यांची आतषबाजी करताना मोठी दुर्घटना घडली आहे. येथील नीलेश्वरमजवळच्या मंदिरात फटाक्यांची आतषबाजी करताना दुर्घटना होऊन १५० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
केरळमधील कासरगोड जिल्ह्यामध्ये मंदिरात फटाक्यांची आतषबाजी करताना मोठी दुर्घटना घडली आहे. येथील नीलेश्वरमजवळच्या मंदिरात फटाक्यांची आतषबाजी करताना दुर्घटना होऊन १५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी ८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना कासरगोड, कन्नूर आणि मंगळुरू येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
या दुर्घटनेबाबत माहिती देताना कासरगोडचे खासदार राजमोहन उन्नीथन यांनी सांगितले की, कासरगोड जिल्ह्यातील नीलेश्वरम येथून काल रात्री एक धक्कादायक बातमी आली आहे. येथे फटाके फोडताना झालेल्या दुर्घटनेत १५४ जण जखमी झाले आहेत. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
#WATCH | Kerala: On over 150 people injured in a fireworks accident in Nileshwaram, Kasargod MP Rajmohan Unnithan says, "Shocking news came from Nileshwaram in Kasargod district last night. About 154 people have been injured and admitted to different hospitals. This Theyyam… https://t.co/pPob9PzoK0pic.twitter.com/SnlHsTKwS8
— ANI (@ANI) October 29, 2024