हैदराबाद तेलंगणातील २० वर्षांचा नीलकंठ भानू प्रकाश जगाभरातील सर्वात वेगवान मानवी कॅलक्युलेटर ठरला आहे. यामुळे भारतीयांमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. संपूर्ण जगभरातून वेगवान मानवी कॅलक्यूलेटर सिद्ध झाल्यानंतर नीलकंठ भानू प्रकाशवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
लंडनमधील माइंड स्पोर्ट्स ऑलिम्पियाडच्या मेंटल कॅलक्युलेशन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये नीलकंठ भानू प्रकाशनं सुवर्णपदक पटकावलं आहे. या चॅम्पियनशिपमध्ये एकूण १३ देशांचा सहभाग होता. भारतासह जर्मनी, यूएई, फ्रान्स, लेबनान, ग्रीस इतर देशांचा सहभाग होता. सगळ्या देशांचे मिळून २९ स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होते.
२९ स्पर्धकांना नीलकंठ भानू प्रकाश यानं हरवलं आहे आणि या स्पर्धेत भारताला पहिलं सुवर्णपदक जिंकून दिलं आहे. याशिवाय नीलकंठ इतर मुलांना गणित शिकवण्याचे काम करतो. मेंदूला चालना देणारं साधन तयार करण्यासाठी प्रोत्साहित करतो. नीलकंठ या स्पर्धकाने दिलेल्या माहितीनुसार माइंड स्पोर्ट्स ऑलिम्पियाडमध्ये भारताला पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळालं आहे. त्याचा मेंदू कॅल्युलेटरपेक्षा जलद काम करतो. वेगवान मानवी कॅलक्युलेटर म्हणून भानूने ४ वर्ल्ड रेकॉर्ड आणि ५० लिम्का रेकॉर्ड केले आहेत.
नीलकंठ म्हणाला,'' गणित तज्ज्ञ स्कॉट फ्लँसबर्ग आणि शंकुतला देवी यांच्याप्रमाणे हा रेकॉर्ड तोडणं म्हणजे भारतासाठी खूप अभिमानास्पद आहे. जागतिक स्तरावरील गणितात भारताला मी उंचावर नेऊन ठेण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन आणि इतर प्राचीन भारतीय गणिती तज्ज्ञांची प्रेरणा घेतली आहे''. नीलकंठच्या या कामगिरीबद्दल देशभरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
हे पण वाचा-
खुशखबर! नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या लसीची चाचणी यशस्वी; कितपत सुरक्षित ठरणार? जाणून घ्या
देशातील ५ ते १७ वर्षीय मुलांना कोरोनाचा अधिक धोका; सर्वेक्षणात खुलासा