नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फेब्रुवारीच्या ‘मन की बात’ मध्ये नीरव मोदीची २२ हजार कोटींची लूट व ५८ हजार कोटींचा राफेल घोटाळा या विषयांवर बोलावे, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुचवले आहे. या विषयांवरील आपले प्रवचन ऐकण्यास मी उत्सुक आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.गेल्या महिन्यात मी केलेल्या सूचनांकडे आपण दुर्लक्ष केले. प्रत्येक भारतीयाला आज तुम्ही ज्यावर बोलावे, असे वाटते तो विषय तुम्हाला ठाऊक असताना लोकांकडून सूचना मागवण्याची गरजच काय?, असे राहुल यांनी म्हटले आहे.मोदी व चोकसी यांचा घोटाळा उघडकीस आला आहे. २०११ पासून चुकीच्या पद्धतीने बँकेचे व्यवहार करून, काही जणांशी संगनमताने बँकिंग प्रणालीमध्ये छेडछाड करून बँकांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे. राहुल यांनी या घोटाळ््यात वरिष्ठ अधिकाºयांचा हात असल्याचा आरोप करून, याविषयी पंतप्रधानांनी धारण केलेल्या मौनाबाबत सवाल केला आहे.रविवारीही राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमावर टीका केली. ते म्हणाले की, मोदींकडे विद्यार्थ्यांसाठी दोन तास आहेत, परंतु बँक घोटाळ््यावर बोलण्यासाठी दोन मिनिटेही नाहीत. आपणच अपराध केला आहे, असे वागणे बंद करा, अशीही सूचना गांधी यांनी केली आहे.जानेवारीमध्ये मोदी यांना ‘मन की बात’साठी राहुल यांनी बेरोजगारी, चीनची घुसखोरी व हरियाणातील बलात्कार हे विषय सुचवले होते. राहुल गांधी यांनी टष्ट्वीटरवर उपस्थित केलेल्या मुद्द्यांना लाखो नेटिझन्सनी पाठिंबा दिसत आहे.राहुल गांधी यांनी आरोप केला आहे की, पंतप्रधानांनी नोटबंदीसारखे निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. त्यांनी जनतेला पैसे बँकेत जमा करायला भाग पाडले आणि आता त्यांचे मित्र व हितसंबंधी बँकामध्ये जमा केलेल्या पैशावर डल्ला मारत आहेत. मोदी यावर काहीच बोलत नाहीत!
नीरव मोदी, राफेल घोटाळ्यावरही मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये बोलावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 5:13 AM