शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही आता परजीवी काँग्रेस; ज्याच्यासोबत असते त्यालाच...", पंतप्रधान मोदींची लोकसभेत तुफान फटकेबाजी
2
भावना गवळी, कृपाल तुमानेंना विधानपरिषदेची उमेदवारी; शिंदे गटात नाराजी
3
हाथरस येथील चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा वाढला, रुग्णालयात मृतदेह ठेवण्यासाठीही उरली नाही जागा   
4
"हिंदूंना विचार करावा लागेल, हा अपमान योगायोग की प्रयोग'; लोकसभेत काय म्हणाले PM मोदी?
5
"आजकल बच्चे का मन बहलाने का काम चल रहा है...", निवडणूक निकालावरून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
"सलग तिसऱ्यांदा १०० च्या आत, तिसरा पराभव, तरीही काँग्रेस आणि त्यांची इकोसिस्टिम...", मोदींचा खोचक टोला
7
"बाबूजी म्हणजे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील खणखणीत नाणे", देवेंद्र फडणवीसांकडून स्व. जवाहरलाल दर्डांना अभिवादन
8
“जयंत पाटील तुम्ही नकली वाघांसोबत आहात, जरा असली वाघांसोबत या”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
"मतदारांनी काँग्रेसलाही जनादेश दिला, तो विरोधी बाकावर बसण्याचा", PM मोदींची बोचरी टीका...
10
“तिसऱ्या टर्ममध्ये तिप्पट वेगाने काम, विकसित भारताचा संकल्प पूर्ण होणार”; PM मोदींची लोकसभेत गॅरंटी
11
"2014 पूर्वी देशात घोटाळ्याचा काळ होता...", लोकसभेतून PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
किंग खानच्या शिरपेचात मानाचा तुरा! 'या' इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुखचा होणार खास सन्मान
13
"अब की बार चोको बार", DMK खासदारानं भाजपच्या घोषणेची उडवली खिल्ली!
14
विश्वास वाढवणारा विश्वविजय! देशाने पाहिलेलं गोड स्वप्न साकार होतं तेव्हा...
15
काँग्रेसमधून निवडून आलेलो याचा मला गर्व, शंका नसावी; अशोक चव्हाणांचे राज्यसभेत वक्तव्य 
16
“मी एकनाथ शिंदेंची लाडकी बहीण”; विधान परिषद उमेदवारीवर भावना गवळींची प्रतिक्रिया
17
"राहुल गांधींना 'अभय मुद्रे'संदर्भात ज्ञान नाही; मी त्यांना..."! रामभद्राचार्य स्पष्टच बोलले
18
“राहुल गांधींकडून हिंदू धर्माचा अपमान झाला नाही”; उद्धव ठाकरेंनी केले स्पष्ट, भाजपावर टीका
19
इस्लाममध्येही असते ‘अभय मुद्रा’? राहुल गांधींचा दावा अजमेरच्या चिश्तींनी फेटाळला, म्हणाले, तसा कुठलाही...
20
लफडे... अन् ब्लॅकमेल! तीन वर्षांपासून ज्या तरुणीने १० लाख वसूल केले, ती पत्नीच निघाली

NEET वरून लोकसभेत खडाजंगी, राहुल गांधींनी मुद्दा उपस्थित करताच अध्यक्ष म्हणाले, पूर्ण वेळ घ्या, सविस्तर बोला, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 1:04 PM

NEET Exam News: सध्या देशभरात गाजत असलेल्या नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात जोरदार गदारोळ झाला. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये नीटच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर नीटचा प्रश्न उपस्थित केला.

सध्या देशभरात गाजत असलेल्या नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात जोरदार गदारोळ झाला. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये नीटच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर नीटचा प्रश्न उपस्थित केला. राहुल गांधी यांनी सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी नीटच्या प्रश्नावर चर्चा करण्याची मागणी केली. त्यावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चेदरम्यान, तुम्ही प्रत्येक विषयावर बोलू शकता, असे सांगितले. राहुल गांधी यांनी यावेळी अध्यक्षांकडे दोन मिनिटांचा वेळ मागितला होता, तेव्हा लोकसभा अध्यक्षांनी दोन मिनिटे कशाला, तुमच्या पक्षाचा जेवढा वेळ आहे तेवढा वेळ घ्या, सविस्तर बोला. मात्र तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात. त्यामुळे संसदीय मर्यादांचं पालन करा, असे राहुल गांधी यांना सांगितले.

आज लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहातील १३ माजी सदस्यांच्या निधनाची माहिती सभागृहाला देऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी सदस्यांना त्यांच्यासमोर असलेली कागदपत्रे पटलावर ठेवण्यास सांगितले. त्याचवेळी राहुल गांधी यांनी नीटचा मुद्दा उपस्थित करून त्यावर चर्चा करण्याची मागणी केली. राहुल गांधींच्या  मागणीला उत्तर देताना लोकसभेच्या अध्यक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर तुम्ही कुठल्याही मुद्द्यावर सविस्तर बोलू शकता. तसेच सरकार त्याला उत्तर देईल, अशी मला अपेक्षा आहे, असे सांगितले.  

यादरम्यान, राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांकडे दोन मिनिटांचा वेळ मागिलता. त्यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, दोन मिनिटे कशाला, तुमच्या पक्षाचा जेवढा वेळ आहे, तेवढा वेळ घेऊ शकता. तुम्ही सविस्तर बोला. तुम्ही विरोधी पक्षनेते आहात. संसदीय मर्यादांचं पालन करा. त्यावर राहुल गांधी काही बोलल्याने लोकसभा अध्यक्षांनी त्यांना पुन्हा एकदा माहिती देताना मी माईक बंद करत नाही. इथे कुठलंही बटन नाही आहे, असे सांगितले.

नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून आम्हाला देशातील जे विद्यार्थी आहेत. त्यांना संयुक्त संदेश द्यायचा होता. त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांच्या या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्याचा विचचार केला होता, असेही राहुल गांधी यांनी सांगितले. त्यानंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभागृहात जोरदार गोंधळ घातला, तसेच घोषणाबाजी केली. या गोंधळादरम्यान, ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब केले.  

टॅग्स :NEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसom birlaओम बिर्लाCentral Governmentकेंद्र सरकार