नवी दिल्ली- केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं जेईई आणि नीटच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जेईई व नीट परीक्षा वर्षांतून दोनदा होणार असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी जाहीर केला आहे. जेईईची परीक्षा जानेवारी आणि एप्रिल महिन्यात घेतली जाणार आहेत. तर नीटची परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणार आहे. विद्यार्थ्यांना दुस-यांदा संधी मिळावी या हेतूनं परीक्षा दोनदा घेण्याचं ठरवलं आहे, असंही जावडेकर म्हणाले आहेत. अभियांत्रिकी आणि मेडिकलमध्ये प्रवेश करण्यासाठी जेईई आणि नीट या प्रवेशपरीक्षा द्याव्याच लागतात. त्यामुळेच जेईई आणि नीटच्या विद्यार्थ्यांसाठी त्या महत्त्वपूर्ण असतात. यापूर्वी या दोन्ही परीक्षा पूर्वी वर्षातून फक्त एकदाच होत होत्या. परंतु आता त्या दोनदा होणार आहेत. विशेष म्हणजे ही परीक्षा आता ऑनलाइन पद्धतीनं होणार असल्यानं विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. वर्षातून पहिल्यांदा बसलेल्या परीक्षेत चांगले गुण न मिळाल्यास त्याच वर्षात त्या विद्यार्थ्याला आता दुस-यांचा परीक्षा देता येणार आहे.
जेईई व नीट परीक्षा वर्षांतून दोनदा होणार, मेडिकल, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2018 3:27 PM