'आज संपूर्ण शिक्षण व्यवस्था माफिया आणि भ्रष्ट लोकांच्या हातात', प्रियंका गांधींचा BJP वर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 03:36 PM2024-06-23T15:36:07+5:302024-06-23T15:36:49+5:30
'भाजप सरकारला एक परीक्षादेखील घेता येत नाही,'
NEET Paper Leaked Latest News: देशात सुरू झालेल्या पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विरोधक केंद्रातील भाजप सरकारला धारेवर धरत आहेत. आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनीदेखील NEET पेपरफुटीवरुन मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. 'संपूर्ण शिक्षण व्यवस्था माफिया आणि भ्रष्ट लोकांच्या हातात' गेल्याची टीका प्रियंका यांनी केली.
पंतप्रधान मोदी फक्त सो पाहत आहेत...
रविवारी (23 जून 2024) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेल्या पोस्टमध्ये प्रियंका गांधी म्हणतात, 'देशातील सक्षम तरुण भाजपच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यात आपला बहुमूल्य वेळ आणि शक्ती वाया घालवत आहेत आणि मोदीजी फक्त शो पाहत आहेत. याशिवाय अलीकडच्या काळात फुटलेल्या पेपरचाही उल्लेख करत त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. प्रियांकांनी लिहिले, "NEET-UG पेपर लीक झाला, NEET PG पेपर रद्द झाला, UGC NET परीक्षा रद्द आणि नंतर CSIR NET देखील रद्द झाला. ही आहे देशातील काही मोठ्या परीक्षांची स्थिती."
NEET-UG :- पेपर लीक
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) June 23, 2024
NEET-PG :- रद्द
UGC-NET :- रद्द
CSIR-NET :- रद्द
आज ये देश की कुछ सबसे बड़ी परीक्षाओं का हाल है।
भाजपा राज में समूची शिक्षा का ढाँचा माफियाओं-भ्रष्टाचारियों के हवाले हो चुका है। लालची और चाटुकार किस्म के अयोग्य लोगों के हाथ में देश की शिक्षा और बच्चों…
देशाचे शिक्षण भ्रष्टाचाऱ्यांच्या हाती
प्रियांका गांधी पुढे म्हणाल्या, "भाजपच्या राजवटीत संपूर्ण शिक्षण व्यवस्था माफिया आणि भ्रष्ट लोकांच्या हाती गेली आहे. देशाचे शिक्षण आणि मुलांचे भवितव्य लोभी आणि चाटुगिरी लोकांच्या हाती सोपवण्याच्या राजकीय आडमुठेपणामुळे पेपर फुटणे, परीक्षा रद्द होणे, कॅम्पसमध्ये राजकीय गुंडगिरी, हे आपल्या शिक्षण व्यवस्थेचे वैशिष्ट्य बनले आहे. भाजप सरकारला एकही परीक्षा घेता येत नाही," अशी जोरदार टीका प्रियंका गांधी यांनी केली.