शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

'आज संपूर्ण शिक्षण व्यवस्था माफिया आणि भ्रष्ट लोकांच्या हातात', प्रियंका गांधींचा BJP वर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 15:36 IST

'भाजप सरकारला एक परीक्षादेखील घेता येत नाही,'

NEET Paper Leaked Latest News: देशात सुरू झालेल्या पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विरोधक केंद्रातील भाजप सरकारला धारेवर धरत आहेत. आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनीदेखील NEET पेपरफुटीवरुन मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. 'संपूर्ण शिक्षण व्यवस्था माफिया आणि भ्रष्ट लोकांच्या हातात' गेल्याची टीका प्रियंका यांनी केली. 

पंतप्रधान मोदी फक्त सो पाहत आहेत...रविवारी (23 जून 2024) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेल्या पोस्टमध्ये प्रियंका गांधी म्हणतात, 'देशातील सक्षम तरुण भाजपच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यात आपला बहुमूल्य वेळ आणि शक्ती वाया घालवत आहेत आणि मोदीजी फक्त शो पाहत आहेत. याशिवाय अलीकडच्या काळात फुटलेल्या पेपरचाही उल्लेख करत त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. प्रियांकांनी लिहिले, "NEET-UG पेपर लीक झाला, NEET PG पेपर रद्द झाला, UGC NET परीक्षा रद्द आणि नंतर CSIR NET देखील रद्द झाला. ही आहे देशातील काही मोठ्या परीक्षांची स्थिती."

देशाचे शिक्षण भ्रष्टाचाऱ्यांच्या हाती प्रियांका गांधी पुढे म्हणाल्या, "भाजपच्या राजवटीत संपूर्ण शिक्षण व्यवस्था माफिया आणि भ्रष्ट लोकांच्या हाती गेली आहे. देशाचे शिक्षण आणि मुलांचे भवितव्य लोभी आणि चाटुगिरी लोकांच्या हाती सोपवण्याच्या राजकीय आडमुठेपणामुळे पेपर फुटणे, परीक्षा रद्द होणे, कॅम्पसमध्ये राजकीय गुंडगिरी, हे आपल्या शिक्षण व्यवस्थेचे वैशिष्ट्य बनले आहे. भाजप सरकारला एकही परीक्षा घेता येत नाही," अशी जोरदार टीका प्रियंका गांधी यांनी केली.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस