शहरं
Join us  
Trending Stories
1
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
2
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
3
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
5
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
6
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
7
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
8
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
9
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
10
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
11
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
12
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
13
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
14
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
15
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
16
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
18
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
19
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
20
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं

NEET PG exam 2022: केंद्राचा मोठा निर्णय! NEET PG परीक्षेला स्थगिती, 'या' कारणामुळे घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 11:30 AM

NEET PG exam 2022: 12 मार्च रोजी होणारी NEET PG परीक्षा रद्द करण्यात आली असून, सरकारने ही परीक्षा 6-8 आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे. नवी तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.

नवी दिल्ली: मागील अनेक दिवसांपासून देशात मोठा चर्चेचा विषय ठरलेल्या NEET PG परीक्षेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून NEET PG 2022 ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने परीक्षा 6 ते 8 आठवडे पुढे ढकलली आहे. ही परीक्षा आधी 12 मार्च रोजी होणार होती, पण आता तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती

NEET PG परीक्षेबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. NEET परीक्षा तूर्तास पुढे ढकलण्यात यावी, अशी याचिका अनेक विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होणार होती. याचिकाकर्त्यांनी त्यांच्या याचिकेत मेडिकल इंटर्नशिपचा हवाला दिला होता. अनेक विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप पूर्ण केलेली नाही. ते म्हणाले की, दोन बॅचला एकाच वेळी सर्व जागा कशा देता येतील. त्यामुळे 12 मार्च रोजी परीक्षा घेणे योग्य नाही.

विद्यार्थ्यांची कोर्टात याचिकापरीक्षा पुढे ढकलण्याची अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांची मागणी होती. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, NEET PG समुपदेशनाच्या गेल्या वर्षीच्या म्हणजेच 2021 च्या तारखा या वर्षीच्या परीक्षेच्या तारखेसोबत येत आहेत. अशा परिस्थितीत आगामी परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात. विद्यार्थ्यांनी ही मागणी सोशल मीडियावर मांडली आणि आरोग्य मंत्रालयाकडे या प्रकरणी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती सातत्याने केली. यासाठी विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल केली होती, त्यावर कोर्टानेही विचार करण्यास मान्यता दिली होती. विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त मानून आरोग्य मंत्रालयाने आता परीक्षा 6 ते 8 आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे. 

टॅग्स :examपरीक्षाCourtन्यायालयStudentविद्यार्थी