नवी दिल्ली- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एमडी, एमबीबीएसच्या वैद्यकीय शिक्षणासाठी घेतल्या जाणा-या पात्रता प्रमाणपत्र परीक्षे(NEET)चा निकाल जाहीर झाला आहे. नीट परीक्षेत 720 पैकी 691 गुण मिळवत कल्पना कुमारी देशात पहिली आली आहे. तर नांदेडचा कृष्णा अग्रवाल देशात सातवा आला असून, त्याला 720 पैकी 685 गुण मिळाले आहेत. देशभरातून 13 लाख 26 हजार 725 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.देशभरात नीट परीक्षेत 13,25,725 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर महाराष्ट्रातून एकूण 1,83,961 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई) मार्फत नीट परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी महाराष्ट्रातूनच सर्वाधिक विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. देशभरातून 13 लाख 26 हजार 725 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.नीटमध्ये पास झाल्यानंतर उमेदवाराला ऑल इंडिया कोटा सीटसंबंधित काऊंसलिंग आणि राज्यस्तरावरील काऊंसलिंग या दोन्हीमध्ये सहभागी होण्याची परवानगी मिळते.ऑल इंडिया कोटा सीटसाठी मेडिकल काऊंसलिंग कमिटी करते. नीट परीक्षा पास झालेले विद्यार्थी ऑल इंडिया कोटा काऊंसलिंगसाठी नोंदणी करू शकतात. परंतु नोंदणी करताना त्यांना डेक्लेरेशन फॉर्ममध्ये स्वतःची माहिती द्यावी लागणार आहे. नोंदणी प्रक्रियाही ऑनलाइन होणार आहे. नीट परीक्षेच्या निकालानंतर आता लगेचच नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. तर एआयक्यू काऊंसलिंग 12 जून 2018पासून सुरू होणार आहे. मेडिकलच्या परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये काऊंसलिंगसाठी रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे.
NEET Result 2018: नीट परीक्षेचा निकाल जाहीर, बिहारची कल्पना कुमारी देशात पहिली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2018 1:39 PM