शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

नापाक चेहरा पुन्हा जगासमोर

By admin | Published: August 06, 2015 2:27 AM

आणखी एक पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ला हाणून पाडताना बुधवारी सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) एका अतिरेक्याला ठार केले तर अन्य एका अतिरेक्याला

नापाक चेहरा पुन्हा जगासमोरउधमपूर : आणखी एक पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ला हाणून पाडताना बुधवारी सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) एका अतिरेक्याला ठार केले तर अन्य एका अतिरेक्याला जिवंत पकडले. जम्मू- श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर उधमपूरजवळ सीमा सुरक्षा दलाच्या पथकाला उडविण्याचा अतिरेक्यांचा डाव अपयशी ठरल्याने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासारखा एक आतंक टळला. मात्र २ कॉन्स्टेबल शहीद तर ११ जवान जखमी झाले आहेत. पळून गेलेला अतिरेकी मोहम्मद नावेद गावकऱ्यांनी मोठ्या हिमतीने पकडून दिला. २००८च्या मुंबई हल्ल्यानंतर दहाजणांपैकी अजमल कसाब हा एकटा अतिरेकी हाती लागला होता. कसाबप्रमाणेच नावेदच्या अटकेने भारतातील अतिरेकी कारवायांमधील पाकिस्तानच्या सहभागाचा थेट पुरावा हाती लागला आहे. नावेद हा पाकिस्तानच्या फैसलाबाद शहरातील गुलाम मुस्तफाबाद भागात राहतो. त्याने नोमन ऊर्फ मोमीन या अतिरेकी साथीदारासोबत सकाळी ८ वाजता महामार्गावर सिमरोली येथे बीएसएफच्या पथकावर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात मोमीन मारला गेला तर नावेदने लगतच्या टेकडीवरून गावात घुसून तीन गावकऱ्यांना ओलिस ठेवत थरार चालवला होता. शेवटी गावकऱ्यांनीच त्याच्या मुसक्या बांधत पोलिसांच्या हवाली केले. गेल्याच आठवड्यात गुरुदासपूर येथे पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात सात भारतीय मृत्युमुखी भारताने पकडला पाकी अतिरेकीअतिरेक्यांनी केलेला हा दुसरा हल्ला आहे.पोलिसांनी कोठडीत जाबजबाब देताना नावेद याने नाव आणि वय अनेकदा बदलले. त्याने सर्वप्रथम कासीम खान आणि नंतर उस्मान असे नाव सांगितले. प्रत्यक्षात त्याचे नाव मोहम्मद नावेद असे आहे. त्याला दोन भाऊ आणि बहीण आहे.  त्याचा तपास पुरता संपला नसताना अतिरेक्यांनी केलेला हा दुसरा हल्ला आहे. पोलिसांनी कोठडीत जाबजबाब देताना नावेद याने नाव आणि वय अनेकदा बदलले. त्याने सर्वप्रथम कासीम खान आणि नंतर उस्मान असे नाव सांगितले. प्रत्यक्षात त्याचे नाव मोहम्मद नावेद असे आहे. त्याला दोन भाऊ आणि बहीण आहे.महिन्यापूर्वीच काश्मिरात नावेद आणि अन्य चार अतिरेक्यांनी हल्ल्याच्या मिशनसाठी महिन्यापूर्वीच काश्मीर खोऱ्यातील कूपवाडा जिल्ह्णात प्रवेश केला होता, मात्र त्यांना समोर वाटचाल करता न आल्याने ते पाकव्याप्त काश्मिरात परतले होते, अशी कबुलीही नावेदने दिली आहे. टीव्ही वाहिन्यांशी बोलताना तो निर्धास्त वाटत होता, अनेक उत्तरे त्याने हसत हसत दिली.—————————————महिन्यापूर्वीच काश्मिरात नावेद आणि अन्य चार अतिरेक्यांनी हल्ल्याच्या मिशनसाठी महिन्यापूर्वीच काश्मीर खोऱ्यातील कूपवाडा जिल्ह्णात प्रवेश केला होता, मात्र त्यांना समोर वाटचाल करता न आल्याने ते पाकव्याप्त काश्मिरात परतले होते, अशी कबुलीही नावेदने दिली आहे. टीव्ही वाहिन्यांशी बोलताना तो निर्धास्त वाटत होता, अनेक उत्तरे त्याने हसत हसत दिली.—————————————-शाळेत ओलिसनाट्यबीएसएफने प्रत्युत्तरात गोळीबार केल्यानंतर नावेदने घटनास्थळाहून पळत लगतच्याच शाळेत घुसून तिघांना ओलिस ठेवल्याची माहिती उधमपूरचे उप पोलीस आयुक्त शाहीद इक्बाल चौधरी यांनी प्रारंभी दिली होती.या भागात एम्स रुग्णालय स्थापण्याच्या मागणीवरून बंद पुकारण्यात आल्यामुळे नावेद याने आश्रय घेतलेल्या शाळेत विद्यार्थी नव्हते, असेही ते म्हणाले.—————————अमरनाथ यात्रेकरूंशी संबंध नाही !दरम्यान या हल्ल्याचा अमरनाथ यात्रेकरूंशी संबंध नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख डी. के. पाठक यांच्याशी फोनवर बोलताना या हल्ल्याबाबत विस्तृत माहिती घेतली तसेच शहीद कॉन्स्टेबल रॉकी आणि शुभेंदू रॉय यांच्या कुटुंबीयांप्रति शोकसंवेदना कळविल्या. अमरनाथ यात्रेकरूंच्या वाहनांचा ताफा गेल्यानंतर बीएसएफच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामागे अमरनाथ यात्रेकरूंना लक्ष्य बनविण्याचा हेतू असल्याचा संशय व्यक्त केला जात होता.——————————-ग्रेनेड फेकले, अंदाधुंद गोळीबारसुरक्षा दलाचे पथक जम्मूहून श्रीनगरला जात असताना सामरौलीजवळील नस्सू पट्ट्यात अतिरेक्यांनी ग्रेनेड फेकून अंदाधुंद गोळीबार केला, अशी माहिती जम्मूचे पोलीस निरीक्षक दानीश राणा यांनी दिली. हल्ल्यानंतर या भागात नाकाबंदी करण्यात आली असून जोरदार शोधमोहीम उघडण्यात आली आहे. ——————————रॉकी यांनी दाखविले शौर्य कॉन्स्टेबल रॉकी यांनी एका अतिरेक्याला ठार मारण्यात मोठी भूमिका बजावली. ते मूळचे हरियाणातील होते. रॉय हे अन्य कॉन्स्टेबल प. बंगालमधील असल्याची माहिती बीएसएफच्या दिल्ली मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली. ————————-————————————-ओलिसांनीच पकडून दिले !नावेदने शाळेच्या इमारतीत घुसून काही जणांना ओलिस ठेवले; मात्र दोन ओलिसांनीच त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ते दोघे ग्रामविकास परिषद(व्हीडीसी) सदस्य आहेत. या मोहिमेत त्याला अटक करण्यातही त्यांनी मदत केली, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. नावेदने बंदुकीच्या टोकावर आम्हाला शाळेत नेले. तो पळून जाण्यासाठी रस्ता विचारत होता. त्याने माझ्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकीही दिली होती, आम्ही त्याला थोडे अन्नही दिले, असे ओलिस राहिलेल्या विक्रमजित याने सांगितले. मी त्याची मान पकडली तर माझा सहकारी राकेश याने त्याची बंदूक पकडली. त्याने काही गोळ्या झाडल्या पण आम्ही त्याला पकडूनच ठेवले, अशी माहितीही त्याने दिली.कोटया हल्ल्यामागे कोण आहेत हे सर्वांना चांगले ठाऊक आहे. त्यांच्या दहशतवादी कारवाया भारतात फार काळ चालणार नसल्यामुळे ते असे कृत्य करीत आहेत.- मुख्तार अब्बास नकवी, केंद्रीय मंत्री.अतिरेक्याला जिवंत पकडणे हे मोठे यश आहे. येत्या काळात पाकिस्तानने योजलेल्या हल्ल्यांची माहिती त्यामुळे मिळू शकेल. पाकिस्तानची भूमिका पूर्णपणे उघडी पडली आहे. कसाबला कोणत्या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आले. त्यांनी बोटीचा रंग कसा बदलला या सर्व कटाची माहिती पाकिस्तानच्या माजी तपास अधिकाऱ्याने अलीकडेच दिली आहे.- गुलाम नबी आझाद, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते. या हल्ल्यामागे निश्चितच पाकिस्तान आहे. झाले ते पुरे झाले यापुढे अशा कारवाया खपवून घेतल्या जाणार नाही, असा रोखठोक इशारा भारतीय नेतृत्वाने पाकिस्तानला द्यायला हवा.- फारुक अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री. काश्मीरची स्थिती अतिशय वाईट झाली असून आता नव्याने दहशतवादी कारवाया सुरू झाल्या आहेत. सुशिक्षित युवक दहशतवादाकडे वळू लागले आहेत. आम्ही जम्मूतून दहशतवादी कारवाया हद्दपार केल्या होत्या. आज तुम्ही त्या ठिकाणी हल्ले बघत आहात, हा या सरकारच्या अपयशाचा पुरावा आहे.- ओमर अब्दुल्ला,नॅशनल कॉन्फरन्स———————————————शस्त्रसंधीचे उल्लंघन, महिला जखमीपूँछ जिल्ह्णात पाकिस्तानी जवानांनी केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात एक भारतीय महिला जखमी झाली. अलीकडील पाच दिवसांत पाकिस्तानने किमान ११ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यामुळे नियंत्रण रेषेवर तणाव निर्माण झाला आहे. सब्जियन भागात पाकी सैन्याने पहाटे ८१ एमएम तोफगोळ्यांचा मारा करतानाच स्वयंचलित बंदुकीतून गोळीबार केल्याचे लष्कराच्या प्रवत्याने सांगितले. भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिले. जवळपास दोन तास चकमकी झडत होत्या. ———————————————स्फोटात मुलगा ठार मध्य काश्मीरच्या गंदेरबल जिल्ह्णातील स्फोटात १० वर्षांचा मुलगा ठार तर अन्य दोघे जखमी झाले. मन्सबाल भागातील बाबा सलुईना येथे काही मुले शेतात खेळत असताना अचानक स्फोट झाल्याने आदील अहमद रेशी हा जागीच ठार झाला तर त्याचे दोन मित्र जखमी झाले. बेवारस ग्रेनेड किंवा तोफगोळ्यामुळे हा स्फोट झाल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही, असे एका अधिकाऱ्याने म्हटले.