मनपा आरोग्य विभागात सावळा गोंधळ साथीच्या आजारांकडे दुर्लक्ष: आरोग्य सभापतींच्या पत्राला केराची टोपली आरोग्याचा पंचनामा: 1
By admin | Published: December 08, 2015 1:52 AM
सोलापूर : महापालिकेच्या आरोग्य विभागात सावळा गोंधळ सुरू आहे. इकडे साथीच्या रोगांनी नागरिक हैराण झाले असून, आरोग्य केंद्रात सुविधांची वानवा आहे. याबाबत महापालिका आयुक्तांना आरोग्य सभापतींनी पत्र दिले तरी केराची टोपली दाखविण्यात आली आहे.
सोलापूर : महापालिकेच्या आरोग्य विभागात सावळा गोंधळ सुरू आहे. इकडे साथीच्या रोगांनी नागरिक हैराण झाले असून, आरोग्य केंद्रात सुविधांची वानवा आहे. याबाबत महापालिका आयुक्तांना आरोग्य सभापतींनी पत्र दिले तरी केराची टोपली दाखविण्यात आली आहे. शहरात डेंग्यू संशयित रुग्णांत वरचेवर वाढ होत आहे. पाणीपुरवठा पाच दिवसांनी होत आहे. त्यामुळे नागरिकांना घरात मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा साठा करावा लागत आहे. यामुळे उघड्यावरील स्वच्छ पाण्याच्या साठय़ांमुळे डेंग्यू, मलेरिया फैलावणार्या डासांची उत्पत्ती होत आहे. झोपडप?ी व अनेक नगरात थंडीतापाचे रुग्ण वाढले आहेत. खासगी दवाखान्यात अनेक रुग्णांवर डेंग्यू संशयित म्हणून उपचार करण्यात येणार्या रुग्णांची संख्या मोठी आहे. पण महापालिकेचा आरोग्य विभाग या उपचाराला मानायला तयार नाही. तर दुसरीकडे महापालिकेच्या आरोग्य केंद्रात उपचाराची सुविधा नाही. डॉक्टर वेळेवर हजर नसतात. कर्मचार्यांचा पत्ता नसतो. आरोग्य सभापती राजकुमार हंचाटे यांनी आरोग्य केंद्रांना अचानक भेटी दिल्या. त्यावेळी त्यांना हा सावळा गोंधळ दिसला. दवाखान्यात लेटकमर असलेल्या डॉ. कोळी यांच्याबाबत आरोग्य अधिकारी डॉ. जयंती आडके यांच्याकडे लेखी तक्रार केली, पण उपयोग झाला नाही. आरोग्य केंद्रामध्ये कोणत्याच सुविधा उपलब्ध केल्या जात नाहीत. त्यामुळे गरजू असलेले नागरिकही आरोग्य केंद्राकडे फिरकत नाहीत. इन्फो..आरोग्य सुविधांचा अभावशहरात थंडीताप, मलेरिया व डेंग्यू संशयित रुग्णात सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरपासून वाढ होत आहे. पण या आजाराबाबत आरोग्य विभागाला गांभीर्य नाही. लोकजागरुकता, उपाययोजना प्रभावीपणे होत नाही. फॉगिंग व औषध फवारणी ही केवळ मलमप?ी आहे. सिव्हिल व खासगी रुग्णालयाच्या अहवालांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जाते. इन्फो.असे झाले सर्वेक्षणवजीरनगर, एक व दोन नंबर झोपडप?ी, नई जिंदगी, बुधवारपेठ, वडारगल्ली, बाळे या ठिकाणी सर्वेक्षण करून नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे. ऑक्टोबरमध्ये 37733 तर नोव्हेंबरमध्ये 22727 घरात फॉगिंग केल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. कोट..साथीचे आजार व आरोग्य केंद्रातील सुविधांबाबत तक्रार करूनही आरोग्य अधिकारी डॉ. जयंती आडके यांना गांभीर्य नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांना पत्र दिले आहे. याबाबत अद्याप हालचाल झालेली नाही.राजकुमार हंचाटे,सभापती, आरोग्य विभाग