गोमांस खाणारे जवाहर नेहरू ‘पंडित’ नव्हते, भाजपा आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 11:36 AM2018-08-11T11:36:18+5:302018-08-11T11:43:33+5:30

वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले राजस्थानमधील भाजपाचे आमदार ज्ञानदेव आहुजा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Nehru Ate Beef And Pork, he Cannot be Pandit, Says BJP MLA Gyan Dev Ahuja | गोमांस खाणारे जवाहर नेहरू ‘पंडित’ नव्हते, भाजपा आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

गोमांस खाणारे जवाहर नेहरू ‘पंडित’ नव्हते, भाजपा आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

googlenewsNext

नवी दिल्ली : वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले राजस्थानमधील भाजपाचे आमदार ज्ञानदेव आहुजा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आहुजा यांनी जवाहरलाल नेहरू हे पंडित नव्हते. जे नेहरू गोमांस खायचे ते 'पंडित' असूच शकत नाही, असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 



शुक्रवारी काँग्रेसवर टीका करताना आहुजा थेट नेहरूंवर घसरले. जवाहरलाल नेहरू हे कधीच पंडित नव्हते. ते गोमांस आणि डुकराचेही मांस खायचे. गोमांस खाणारा व्यक्ती पंडित कसा काय? असं आहुजा म्हणाले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे राजस्थान दौऱ्यावर आहेत. ते राज्यातील महत्त्वाच्या मंदिरांमध्ये जाणार आहेत. राहुल यांच्या या दौऱ्यावरही आहुजा यांनी टीका केली. दरम्यान, आहुजा यांची वादग्रस्त विधान करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील त्यांनी गोतस्करी आणि मॉब लिंचिंगच्या घटनांबाबत अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.
 

Web Title: Nehru Ate Beef And Pork, he Cannot be Pandit, Says BJP MLA Gyan Dev Ahuja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.