ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 4 - भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सिक्कीम सीमेसंदर्भात चीनशी कोणताही करार केला नव्हता, याचा खुलासा 58 वर्षांनंतर झाला आहे. देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ब्रिटिशांच्या राजवटीत चीनसोबत सिक्कीम सीमेसंदर्भातील कोणत्याही संधीचं समर्थन केलं नव्हतं. हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार, 1959 सालात लिहिलेल्या एका पत्रानं याचा खुलासा झाला आहे. त्यावेळी नेहरूंनी चीनसोबत सिक्कीम सीमेबाबतच्या संधी करारावर स्वाक्षरी केली नव्हती. याचा खुलासा 58 वर्षांनंतर झाला आहे. त्यामुळे चीनच्या दाव्यातील हवाच निघून गेली आहे. चीनच्या मते, सिक्कीम सीमेवरून भारत आणि भूतानसोबत आमची संधी झाली होती. मात्र नेहरूंनी लिहिलेल्या या पत्राचा या दाव्यात कधीही उल्लेख केलेला नव्हता. पंडित जवाहरलाल नेहरूंनी चीनसोबत तिबेट आणि सिक्कीम सीमेसंदर्भात 1890मध्ये कोणतीही संधी केली नव्हती, ही बाब नेहरूंच्या पत्रामुळे समोर आली आहे. चीन, भूतान आणि भारताच्या डोंगराळ भागातल्या सीमेच्या वादामुळे भारत आणि चीनमधील मतभेद टोकाला गेले आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता जिंग शुआंग यांनी 22 मार्च, 1959 साली लिहिलेल्या या पत्राचा हवाला दिला होता.
नेहरूंनी सिक्कीम सीमेसंदर्भात चीनशी केला नव्हता कोणताही करार
By admin | Published: July 04, 2017 3:13 PM
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सिक्कीम सीमेसंदर्भात चीनशी कोणताही करार केला नव्हता
(सिक्कीम सीमेवर भारतीय लष्करानं वाढवली कुमक)(सिक्कीमच्या नाथू ला येथून जाणारी कैलास मानसरोवर यात्रा रद्द)
डोका ला भागात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये शारीरिक रेटारेटी होऊन परिस्थिती गंभीर झाल्यानंतर भारतीय लष्कराने मेजर जनरल हुद्द्याच्या अधिकाऱ्याला तातडीने तेथे पाठवून चीनच्या समकक्ष लष्करी अधिकाऱ्याशी ध्वजबैठक घेण्याचा प्रस्ताव दिला. दोनदा नकार दिल्यानंतर तिसऱ्या वेळी चीन ध्वजबैठकीला आला पण डोका लाच्या लालटेन भागातून भारतानेच आपले सैन्य काढून घ्यावे, असा उरफाटा प्रस्ताव त्याने दिला. चीनने सिक्किम सीमेवरील या घटनाक्रमाचे निमित्त पुढे करून नथु ला खिंडीतून जाणारी कैलास-मानसरोवर यात्राही अडवून ठेवली. त्यामुळे चीन भारताला जेरीस आणण्याचे प्रयत्न सर्व पातळ्यांवर करत असल्याचे दिसते. परंतु भारताने आपली खंबीर भूमिका कायम ठेवून या दबावाला भीक घातलेली नाही.