काँग्रेस पक्षाचे ८४ वे अधिवेशन गुजरातमध्ये सुरू आहे. काँग्रेसचे जवळपास ६४ वर्षांनी गुजरातमध्ये अधिवेशन होत आहे, यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपा नेते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. यावेळी यादव यांनी माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्याबाबतीत एक किस्सा सांगितला.
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी इतिहासातील एक किस्सा सांगितला. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभ पटेल यांचे सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण नाकारले होते, नेहरूंना त्यावेळी एखाद्या विशिष्ट धर्माच्या भावना दुखावण्याची भीती वाटत होती, असा गौप्यस्फोट केला.
देशाचा एक्स-रे व्हावा; मग कळेल देशात OBC-दलित अन् अल्पसंख्याक..; राहुल गांधींचा हल्लाबोल
अहमदाबाद येथील काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्यानंतर सरदार पटेल यांनी नेहरूजींना आपल्या पहिल्या ज्योतिर्लिंग सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले होते, यासाठी त्यांनी नकार दिला होता. आजही राहुल गांधी राम मंदिरात जाण्याचे टाळत आहेत. मतांसाठी तुम्ही काहीही बोलू शकता, पण लोकांना सगळं समजतं. जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट गटाच्या मतांसाठी बहुसंख्य गटावर अन्याय करता तेव्हा लोक कधीही माफ करत नाहीत, असा टोलाही मुख्यमंत्री यादव यांनी लगावा.
"आपण भाग्यवान आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप त्यांच्या मित्रपक्षांसह २१ राज्यांमध्ये सरकार चालवत आहे, असंही यादव म्हणाले.
'नेहरुंनी निमंत्रण नाकारले'
सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीनंतर, देशाचे तत्कालीन कुलगुरू आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना आमंत्रित करायला हवे होते. नेहरूंनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे निमंत्रण नाकारले होते. नेहरू म्हणाले होते की, 'असे करू नका' कारण यामुळे एकाच धर्माचे अनुयायी दुःखी होतील. एका विशिष्ट समुदायाच्या फायद्यासाठी नेहरूंनी सोमनाथ मंदिराचे उद्घाटन करण्यास नकार दिला, असा गौप्सस्फोट यादव यांनी केला.