इंदोर, दि. 4 - इंदोरमध्ये गावक-यांनीच दोन तरुणांचं लग्न लावून देण्यात आल्याने सर्वांनाच आश्यर्याचा धक्का बसला. पण तुम्ही समजताय तसं हे तरु गावकरी पुढारलेल्या विचारांचे वैगेरे अजिबात नाहीत, तर हे सर्व अंधश्रद्धेपोटी करण्यात आलं आहे. आतापर्यंत पाऊस पडावा म्हणून बेडूक, गाढवांचं लग्न लग्न लावण्यात आल्याचं अनेकदा पाहिलं आहे. पण जे आजतागायत घडलं नाही ते इंदूरमधील ग्रामस्थांनी केलं आहे. पाऊस पडावा म्हणून त्यांनी चक्क दोन तरुणांचं लग्न लावून दिलं. आता ही अंधश्रद्धा आहे यात काहीच वाद नाही. पण लग्न सुरु असतानाच पाऊस पडू लागल्याने गावक-यांनी मात्र एकच जल्लोष सुरु केला.
इंदूरजवळच्या मूसाखेडी गावातील ग्रामस्थांनी जेव्हा दोन तरुणांना लग्नाच्या कपड्यांमध्ये पाहिलं तेव्हा सुरुवातीला त्यांनाही आश्चर्य वाटलं. एखाद्या लग्नाला ज्याप्रमाणे नातेवाईक हजेरी लावतात, त्याप्रमाणे या लग्नाही नातेवाईकांची झुंबड उडाली होती. वरुणदेवाला प्रसन्न करण्यासाठी समलैंगिक नसतानाही या तरुणांचं लग्न लावून देण्यात आलं.
विशेष म्हणजे या लग्नासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. लग्न झालं तोपर्यंत ठीक होतं, पण लग्न झाल्यानंतर वरातही काढण्यात आली. गावातील मुख्य रस्त्यांवरुन काढण्यात आलेल्या या वरातीत नातेवाईकांनी बॉलिवूड गाण्यांवर चांगलाच ठेका धरला. हिंदू पुजा-याने हे लग्न लावण्याची जबाबदारी पुर्ण केली. सर्वात आश्चर्याची किंवा हास्यास्पद म्हणा, पण जेव्हा या दोन तरुणांचं लग्न लावून देण्यात येत होतं, सप्तपदी घेतली जात होती तेव्हा त्यांच्या बायका आणि मुलं तिथे उभं राहून सगळं पाहत होते.
कहर म्हणजे लग्न लावून झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून गायब झालेला पाऊस धो-धो कोसळायला लागला. पाऊस पडू लागल्याने गावक-यांनी एकच जल्लोष सुरु केला. पावसामुळे आपल्या या अंधश्रद्धेवर त्यांचा चांगलाच विश्वासही बसला.
ज्याच्यासाठी हा सगळा खटाटोप केला तो पाऊस आल्यानंतर गावक-यांनी जल्लोष केला आणि आपलं घर गाठलं. यानंतर विविहित जोडपं सखाराम आणि राकेश यांनीही आपल्या पत्नी आणि मुलांसोबत घऱचा रस्ता धरला.