शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

नदी मन जोडते! महाकाली नदीचा प्रवाह बदलणार नाही, भारत-नेपाळमधील बैठकीत सहमती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2022 10:38 AM

नेपाळ आणि भारताने बुधवारी महाकाली नदीला मूळ प्रवाहात वाहू देण्याचे मान्य केलं आहे.

नेपाळ आणि भारताने बुधवारी महाकाली नदीला मूळ प्रवाहात वाहू देण्याचे मान्य केलं आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. भारताच्या पिथौरागढ जिल्ह्यातील धारचुला येथे नेपाळ-भारत सीमेवर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि जिथे दोन्ही बाजूंनी तात्पुरता बंधारा काढून नदीला नैसर्गिक मार्गावर वाहू देण्यावर सहमती दर्शविली गेली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यापूर्वी भारतानं महाकाली नदीचा प्रवाह वळवण्यासाठी तात्पुरता बंधारा बांधल्यानंतर या भागात तणाव निर्माण झाला होता.

धारचुला दीरघचे मुख्य जिल्हा अधिकारी राज उपाध्याय यांनी सांगितले की, बुधवारी दोन्ही देशांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत नेपाळने केलेल्या विनंतीनुसार १० दिवसांच्या आत तात्पुरत्या तटबंदीचा ढिगारा हटवण्याचे भारतानं मान्य केलं आहे. महाकाली नदी उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यातील धारचुला येथे भारत आणि नेपाळ दरम्यान वाहते. या नदीवर भारतानं बांधलेल्या सुरक्षा भिंतीमुळे नदीचे पाणी नेपाळकडे वळवल्यानं पूरस्थिती निर्माण होण्याची भीती नेपाळमध्ये निर्माण झाली होती.

नेपाळचं भारताला पत्रधारचुलामध्ये बुधवारी दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत नेपाळी अधिकारी दिर्घराज उपाध्याय उपस्थित होते. "आम्ही डेब्रिज हटवण्याच्या कामासाठी निविदा मागवल्या आहेत. १० दिवसांत ढिगारा हटवण्याची प्रक्रिया सुरू होईल", अशी माहिती उपाध्याय यांनी दिली. तळबंधाच्या बांधकामावरून निर्माण झालेल्या वादानंतर नेपाळने मंगळवारी भारताला पत्र पाठवलं होतं. 

नेपाळी आणि भारतीय लोकांमध्ये संघर्षदोन्ही देशांच्या सुरक्षा अधिकार्‍यांमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान, नेपाळच्या विनंतीनुसार भारतीय अधिकाऱ्यांनी १० दिवसांच्या आत बांधकाम हटविण्याचं मान्य केलं. धारचुलाचे मुख्य जिल्हा अधिकारी दीर्घराज उपाध्याय यांनी ही माहिती दिली. सूत्रांनी सांगितलं की, भारतीय अधिकाऱ्यांनी तटबंदी क्षेत्राची पाहणी केली आहे. दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत नेपाळचे प्रतिनिधित्व धीरघराज उपाध्याय, सशस्त्र पोलिस दल धारचुलाचे डुंबर बिश्त, नेपाळ पोलिसांचे तारकराज पांडे आणि महाकाली नदी नियंत्रण प्रकल्पाचे कार्यवाहक प्रमुख करण सिंह धामी यांनी केलं. या काळात डीएम रीना जोशी आणि एसडीएम दिवेश मुन्नी यांनी भारतीय बाजूचं प्रतिनिधित्व केलं. यापूर्वी धारचुलामध्ये नेपाळी आणि भारतीय लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली होती. यामध्ये एका नागरिकासह चार नेपाळी जखमी झाले.