गाझीपूर - नेपाळच्या पोखरा भागात झालेल्या प्लेन दुर्घटनेत ७२ लोकांचा मृत्यू झाला. त्या मृतांपैकी ४ युवक उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये राहणारे होते. चौघे नेपाळला फिरण्यासाठी गेले होते. त्यातील सोनू जयस्वालनं विमान दुर्घटनेच्या काही मिनिटांपूर्वीच लाईव्ह व्हिडिओ बनवला होता. जो प्लेन दुर्घटनेनंतर समोर आला. सोनूच्या लाईव्ह व्हिडिओत विमान दुर्घटना कैद झाली आहे.
पोखरा प्लेन दुर्घटनेनंतर गाझीपूरमध्ये शोककळा पसरली आहे. चौघा मित्रांच्या अचानक जाण्यानं प्रत्येकाचे डोळे पाण्याने भरले आहेत. या दुर्घटनेत सोनू जयस्वालसह विशाल शर्मा, अनिल राजभर आणि अभिषेक कुशवाहा यांनी जीव गमावला. चौघांचे वय २३ ते २८ वयोगटातील होते. या चौघांचे मृतदेह गाझीपूरमध्ये आणणार असून त्याठिकाणी अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली आहे.
या दुर्घटनेने अनेकांना धक्का बसला. त्यातील दिलीप वर्मा, चौघा मित्रांबद्दल दिलीप वर्मा म्हणाले की, त्या चौघांनी पशुपतिनाथ मंदिरातील दर्शनानंतर व्हिडिओ बनवला होता. बसहून पोखराला जाणार म्हटलं. परंतु अचानक कार्यक्रमात बदल झाला आणि सर्वांनी प्लेनचं तिकीट खरेदी केले. हाच प्रवास त्यांच्या आयुष्यातील अखेरचा प्रवास ठरेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. नेपाळ प्लेन दुर्घटनेत सर्वाधिक चर्चा २८ वर्षीय सोनू जयस्वालच्या व्हिडिओची होत आहे. दुर्घटनेच्या काही मिनिटांपूर्वीच त्याने लाईव्ह व्हिडिओ सुरू केला होता आणि सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला. सोनू जयस्वाल बियर शॉप चालवायचा. चौघा भावांमध्ये तो लहान होता आणि घरापासून वेगळे राहत होता. सोनूला २ मुली आणि १ मुलगा आहे.
या अपघातानंतर सोनूच्या अलवलपूरच्या घरी कोणीही नाही. घराला कुलूप आहे. त्याचा भाऊ नेपाळला रवाना झाला असून आज मृतदेह आणला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. सोनू जयस्वालसोबत विशाल शर्माही गेला होता. मृत्युमुखी पडलेल्या चौघांमध्ये विशाल शर्मा सर्वात लहान आहे.
आजारी आईला मुलगा गेल्याची माहिती नाहीविशाल शर्मा (२३) हा स्थानिक टीव्हीएस बाईक एजन्सीमध्ये बाइक फायनान्स काम करायचा. विशालचे वडील जॉर्जिया (परदेशात) आहेत, लहान भाऊ अजूनही शाळेत आहे आणि आई खूप आजारी आहे. त्यामुळे मुलाच्या मृत्यूची माहिती प्रशासनाने आईला दिलेली नाही. विशाल शर्माच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती देण्यात आली, त्यानंतर मृतदेह आणण्यासाठी नातेवाईकच नेपाळला गेले आहेत.
अनिल राजभर असे अपघातात जीव गमावलेल्या तिसऱ्या मित्राचे नाव आहे. २८ वर्षीय अनिलचे गाव चकदरिया चकजैनब आहे. तो शेतकरी कुटुंबातील आहे. त्याचे अलवलपूर मार्केटमध्येच किराणा दुकान आहे. याशिवाय धारवण गावातील अभिषेक कुशवाह (वय २३ वर्ष) याचाही मृत्यू झाला आहे. अभिषेकचे वडील मून यांना ही बातमी कळताच धक्का बसला. सोनू, अनिल, विशाल आणि अभिषेक सगळे मित्र होते. १२ जानेवारीला अनिल राजभर, विशाल शर्मा आणि अभिषेक कुशवाह एकत्र वाराणसीतील सारनाथला पोहोचले, तेथून सोनू जयस्वालसह काठमांडू, नेपाळला रवाना झाले. सर्व मित्र रविवारी सकाळी काठमांडूहून फ्लाईट घेऊन पोखराला निघाले होते.