शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

नाशिकमधील नेपाळी बांधव अस्वस्थ

By admin | Published: April 26, 2015 10:10 PM

नाशिक : नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे काठमांडूमध्ये प्रचंड जीवितहानी झाल्याचे वृत्त पसरताच शहरातील नेपाळी बांधवांमध्ये दिवसभर चिंता व्यक्त केली जात होती. प्रत्येकजण आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती जाणून घेत होते. दरम्यान, काहींचा संपर्क होऊ न शकल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली.

नाशिक : नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे काठमांडूमध्ये प्रचंड जीवितहानी झाल्याचे वृत्त पसरताच शहरातील नेपाळी बांधवांमध्ये दिवसभर चिंता व्यक्त केली जात होती. प्रत्येकजण आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती जाणून घेत होते. दरम्यान, काहींचा संपर्क होऊ न शकल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली. शनिवारच्या सकाळी ८० वर्षांतील सर्वांत मोठ्या विनाशकारी भूकंपाच्या धक्क्याने नेपाळ हादरले. या भूकंपामध्ये राजधानी काठमांडूमधील धरहरा टॉवर, दरबार चौक या ऐतिहासिक वास्तू जमीनदोस्त झाल्या. ७.९ रिश्टर स्केल तीव्रतेने भूकंपाचे हादरे बसल्याने प्रचंड प्रमाणात हानी झाली. दरम्यान, यामुळे शहरातील नेपाळी बांधव आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधून तेथील परिस्थितीचा आढावा घेत होते, तर ज्यांचा संपर्क होऊ शकला नाही, अशांनी नेपाळकडे जाण्यासाठी थेट नाशिकरोड रेल्वेस्थानक गाठले. मात्र लांब पल्ल्याच्या सर्व गाड्या १५ मेपर्यंत फुल्ल असल्याने त्यांना तिकीट मिळू शकले नाही. त्यामुळे त्यांच्यात घबराट पसरली होती, तर काहींना रडू कोसळले होते. दरम्यान, सायंकाळी ७ वाजेनंतर नाशिकरोड भागात सर्व नेपाळीबांधव एकत्र जमले होते. सकाळीच याबाबतचे वृत्त कळाल्याने बहुतेकांनी कामावर न जाता कुटुंबीयांशीच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत संपर्क साधण्याचे काम सुरू होते. शहरात तीन हजारांपेक्षा अधिक नेपाळी बांधव आहेत. ---चौकटसकाळी टीव्हीवर याबाबतचे वृत्त कळताच मी कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दुपारी १२ वाजेपर्यंत संपर्क होऊ न शकल्याने मनात भीती निर्माण झाली होती. दिवसभर कुटुंबीयांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती जाणून घेत होतो. - विशाल शर्माकुटुंबातील काही मंडळी बाहेरगावी असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. नातेवाइकांना संपर्क करून याबाबतची माहिती घेत होतो. एखाद्याच्या कुटुंबीयांच्या खुशालीची माहिती मिळताच त्याला त्याबाबतचे कळविले जात होते. - भूपेन्द्र डिशी