काठमांडू / नवी दिल्ली : नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली शुक्रवारी ७७ सदस्यीय प्रतिनिधी मंडळासह भारताच्या दौऱ्यावर दाखल झाले. दिल्ली येथे विमानतळावर परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांचे स्वागत केले. ओली यांचा हा पहिला भारत दौरा आहे. पाच महिन्यांपूर्वी त्यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. ओली हे सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. आर्थिक, सांस्कृतिक आणि ऊर्जा क्षेत्रात दोन्ही देश महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षऱ्या करू शकतात. भूकंपानंतर नेपाळमधील पुनर्वसनासाठी भारताने यापूर्वीच एक अब्ज डॉलर देण्याची घोषणा केलेली आहे. (वृत्तसंस्था)
नेपाळी पंतप्रधानांचे भारतात आगमन
By admin | Published: February 20, 2016 2:49 AM