नवी दिल्ली - टी.आर.झेलियांग यांनी नागालँडच्या मुख्यमंत्रीपदाचा पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यपाल पी.बी.आचार्य यांनी त्यांच्या जागी नॅशनॅलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे (एनडीपीपी) नेते नेफ्यू रियो यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. आचार्य यांनी रियो यांना 16 मार्चपूर्वी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे.
नागालँड विधानसभेत एकूण 60 आमदार आहेत. रियो आघाडीचे नेते असून या आघाडीत भाजपाही आहे. येत्या 8 मार्चला मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. टी.आर.झेलियांग यांनी आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल आचार्य यांच्याकडे सुपूर्द केला.
त्यांनी सुद्धा सरकार स्थापनेचा दावा केला आहे. या निवडणुकीत त्यांच्या एनपीएफ पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. एनपीएफने 27 जागा जिंकल्या आहेत बहुमतासाठी त्यांच्याकडे चार जागा कमी आहेत.