नवी दिल्ली : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबतच्या आणखी २५ गोपनीय फाईल्स या महिन्यात सार्वजनिक होऊ शकतात. सांस्कृतिकमंत्री महेश शर्मा यांनी रविवारी याबाबतचे संकेत दिले.शर्मा यांना नेताजींसंदर्भातील गोपनीय दस्तऐवजांबाबत विचारले असता ते म्हणाले की, आम्ही दर महिन्याला २५ फाईल सार्वजनिक करणार आहोत. फाईल तयार आहेत. या महिन्यात त्या सार्वजनिक होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत २३ जानेवारीला नेताजींच्या ११९ व्या जयंतीदिनी नेताजींसंदर्भातील १०० फाईल्स सार्वजनिक केल्या होत्या.एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेताजींबाबतच्या फाईल्स २३ फेबु्रवारीला सार्वजनिक केल्या जाऊ शकतात
नेताजींबाबतच्या आणखी २५ फाईल्स सार्वजनिक होणार
By admin | Published: February 15, 2016 3:45 AM