नवी दिल्ली - 2019मधील लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी मोट बांधायला सुरुवात केली आहे. भाजपाचा पाडावा करण्यासाठी विरोधी पक्षांमध्ये बैठकांवर बैठकांचं आयोजन करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधात लढण्यासाठी बिगर काँग्रेस पक्षांची तिसरी आघाडी स्थापण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नवी दिल्लीच्या दौ-यावर आहेत. या दौ-यादरम्यान त्या भाजपाविरोधी पार्टीतील नेत्यांची भेट घेत आहेत.
मंगळवारी (27 मार्च) संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये ममतांनी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. ममता बॅनर्जी यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बीजेडी आणि डीएमकेच्या नेत्यांचीही भेट घेतली. मात्र, या भेटीवरुन संजय राऊत यांच्यावर नेटीझन्सनी हिंदुत्ववादावरुन प्रश्नांचा भडीमार केला आहे. संजय राऊत यांनी ममता बॅनर्जींसोबतच्या भेटीचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. संजय राऊत-ममता बॅनर्जींच्या भेटीवर नेटीझन्सनी प्रचंड टीका करत हिंदुत्ववादाचा सवाल निर्माण केला. शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडला आहे का?, असा प्रश्न नेटीझन्सनी उपस्थित केला आहे.
काय म्हणालेत नेमके नेटीझन्स?