जन्मदात्री व जन्मभूमीला कधीही विसरू नका योगेंद्रसिंह यादव यांचे युवकांना आवाहन: कारगिल १७ वा विजय दिवस कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Published: August 15, 2016 12:51 AM
जळगाव: आपली जन्मदात्री व जन्मभूमीला कधीही विसरू नका. जे त्यांनी आपल्याला दिले त्याची फेड समाजाच्या विकासासाठी हातभार लावून करा. त्यामुळे समाज विकसीत झाला तर राष्ट्र विकसित होईल. कोणत्याही क्षेत्रात जाल तरी निस्वार्थ भावनेने काम करा, स्वत:वरील राष्ट्रउभारणीची जबाबदारी ओळखा, असे आवाहन कारगिल युद्धातील परमवीरचक्र विजेते सुभेदार योगेंद्रसिंह यादव यांनी केले. कांताई सभागृहात रविवार, १४ रोजी सायंकाळी भवरलाल ॲण्ड कांताई मल्टीपर्पज फाऊंडेशन, युवाशक्ती फाऊंडेशन व आशा फाऊंडेशनतर्फे आयोजित १७व्या कारगिल विजय दिवस कार्यक्रमात ते बोलत होते.
जळगाव: आपली जन्मदात्री व जन्मभूमीला कधीही विसरू नका. जे त्यांनी आपल्याला दिले त्याची फेड समाजाच्या विकासासाठी हातभार लावून करा. त्यामुळे समाज विकसीत झाला तर राष्ट्र विकसित होईल. कोणत्याही क्षेत्रात जाल तरी निस्वार्थ भावनेने काम करा, स्वत:वरील राष्ट्रउभारणीची जबाबदारी ओळखा, असे आवाहन कारगिल युद्धातील परमवीरचक्र विजेते सुभेदार योगेंद्रसिंह यादव यांनी केले. कांताई सभागृहात रविवार, १४ रोजी सायंकाळी भवरलाल ॲण्ड कांताई मल्टीपर्पज फाऊंडेशन, युवाशक्ती फाऊंडेशन व आशा फाऊंडेशनतर्फे आयोजित १७व्या कारगिल विजय दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, निवृत्त कर्नल पी.आर.सिंग, कॅप्टन मोहन कुलकर्णी, मेजर यशवंत लिमये, उपमहापौर ललित कोल्हे, उज्ज्वल स्प्राऊटर्स स्कूलच्या प्राचार्या गिता रायबागकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गिरीश कुलकर्णी यांनी केले. निशा जैन यांनी बांधली राखीयावेळी निशा जैन यांनी जनतेच्यावतीने सुभेदार यादव यांना राखी बांधली. तसेच आपल्या भाषणात त्यांनी युवकांसाठी जे महत्वाचे करीअर करण्याचे पर्याय आहेत, त्यात सर्वात प्रथम क्रमांक सैन्यदलातील सेवेचा असल्याचे सांगितले. त्यांच्या हस्ते तसेच कर्नल पी.आर. सिंग यांच्या हस्ते सुभेदार यादव यांचा पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कारही करण्यात आला.जळगावकरांचे देशप्रेमनिवृत्त कर्नल पी.आर. सिंग यांनी सैन्यातील रचनेची व सैन्यातील उत्कृष्ट सेवेबद्दल दिल्या जाणार्या पुरस्कारांसाठीच्या निवडीबद्दलची माहिती देत सवार्ेच्च पुरस्कार परमवीरचक्र प्राप्त सुभेदार योगेंद्रसिंह यादव आपल्यात आहेत, हे आपले भाग्य असल्याचे सांगितले. जळगाव हे नॉन मिलिटरी स्टेशन असूनही येथील जनतेत सैन्याबद्दल प्रचंड प्रेम व अभिमान आहे. कारगिल युद्धाच्यावेळी जळगावकरांनी भरभरून मदत दिली. ध्वजदिन निधीसाठीच्या लक्ष्यांकापेक्षा तब्बल ४०० पट अधिक निधी जमा झाल्याची माहिती देत जळगावकरांचे कौतुक केले. गिया रायबागकर यांनीही युवकांना अधिकाधिक संख्येने सैन्यात सामिल होण्याचे आवाहन करीत सुभेदार यादव यांना पुष्पगुच्छ व फ्रेम केलेली कवित भेट दिली.सुभेदार योगेंद्रसिंह यादव यांना वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी सवार्ेच्च परमवीरचक्र पुरस्कार मिळाला आहे.प्रारंभी किशोर बावस्कर व निलांबरी यांनी देशभक्तीपर कविता सादर केल्या.