- हरीश गुप्तानवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांमध्ये जर केंद्र सरकारला काही बदल करावेसे वाटले तर त्याचा अर्थ हे कायदे चुकीचे आहेत, असा होत नाही. विशिष्ट राज्यांतील लोकांची या कृषी कायद्यांबद्दल काहीजण दिशाभूल करत आहेत, असे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शुक्रवारी सांगितले.तोमर यांनी राज्यसभेत सांगितले की, नवे कृषी कायदे अंमलात आले तर शेतकऱ्यांच्या जमिनी दुसरे लोक ताब्यात घेतील, अशा पद्धतीची चुकीची माहिती काही प्रवृत्ती पसरवत आहेत. कंत्राटी शेती कायद्यामध्ये व्यापारी शेतकऱ्यांची जमीन हडपू शकेल, अशी एकजरी तरतूद असली तर ती मला दाखवून द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, तोमर, पीयूष गोयल आणि इतरांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. शनिवारच्या चक्का जामला कसे हाताळायचे याची माहिती शहा यांनी दिली. दोन टिकैत बंधूंशी पडद्याआड चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रपती कोविंद यांच्या भाषणावर आभार प्रदर्शनावरील चर्चेला मोदी राज्यसभेत सोमवारी उत्तर देण्याची शक्यता आहे.तोमर म्हणाले, राज्यसभेत १५ तास चाललेल्या वादविवादात विरोधी पक्ष नेत्यांनी तीन कृषी कायद्यांत एकही दोष दाखवून दिलेला नाही. काँग्रेसबाबत केलेले आक्षेपार्ह विधान नंतर कामकाजातून काढून टाकण्यात आले.
नवे कृषी कायदे अजिबात चुकीचे नाहीत, कृषिमंत्री तोमर यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2021 6:12 AM