जगातील प्रमुख विद्यापीठांतील शास्त्रज्ञांच्या टीमने कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत मोठं यश मिळवलं आहे. या टीमने कोरोनाला हरवण्यासाठी एक नवीन ऑल-इन-वन डोस विकसित केला आहे. अशी अपेक्षा आहे की, हा डोस मानवाला कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटपासून वाचवू शकतो. यामध्ये त्या व्हेरिएंटचाही समावेश आहे जो अद्याप समोर आलेला नाही. कोरोनाबाबत असं समोर आलं आहे की, हा व्हायरस लोकांच्या समस्या वाढवत आहे. या व्हायरसपासून संरक्षण फक्त लसीद्वारेच शक्य आहे.
अमेरिका आणि युरोपमधील शास्त्रज्ञांनी एकत्रितपणे एक नवीन ऑल इन वन लस शोधली आहे. ही लस ओमायक्रॉन, डेल्टा, अल्फा, गामा, एक्स यासह कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटपासून संरक्षण करू शकते. या शास्त्रज्ञाचे हे संशोधन सोमवारी 'नेचर नॅनोटेक्नॉलॉजी'मध्ये प्रकाशित झाले असून, त्यात असं म्हटलं आहे की, हा नवीन शोध लस विकासाचा दृष्टीकोन प्रोॲक्टिव्ह व्हॅक्सिनोल़ॉजीवर आधारित आहे, ज्याने उंदरांमध्ये आशादायक परिणाम दाखवले आहेत.
अमेरिकेतील ऑक्सफर्ड, केंब्रिज युनिव्हर्सिटी आणि कॅलटेकच्या संशोधकांनी संयुक्तपणे हा अभ्यास केला आहे, ज्यामध्ये कोरोना व्हायरसच्या आठ वेगवेगळ्या प्रकारांवर त्याचा परिणाम देखील तपासण्यात आला. यामध्ये SARS-CoV-2 चा देखील समावेश आहे ज्यामुळे कोविड-19 चा उद्रेक झाला आणि सध्या हवेत फिरत आहे. मानवांमध्ये पसरण्याची आणि साथीच्या रोगांना कारणीभूत होण्याची क्षमता असलेल्या अनेक व्हेरिएंटचा यामध्ये समावेश आहे.
केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या फार्माकोलॉजी विभागातील पदवीधर संशोधक रॉरी हिल्स म्हणाले, आमचं लक्ष पुढील कोरोना व्हायरसपासून संरक्षण करेल असा डोस तयार करण्यावर आहे. लवकरच ते तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उदाहरणार्थ, नवीन डोसमध्ये SARS-CoV-1 कोरोना व्हायरसचा समावेश नाही. परंतु तरीही ते त्या व्हायरसविरूद्ध मानवांमध्ये रोगप्रतिकारक प्रतिक्रिया निर्माण करू शकते.
हिल्स म्हणाले, आम्ही एक डोस तयार केला आहे जो विविध प्रकारच्या कोरोना व्हायरसपासून संरक्षण प्रदान करतो, ज्यामध्ये आम्हाला अद्याप माहीत नसलेल्या व्हेरिएंटचा समावेश आहे. त्याच्या प्रभावीतेची गुरुकिल्ली अशी आहे की, लसीचे लक्ष्य असलेले विशिष्ट व्हायरस क्षेत्र अनेक संबंधित कोरोना व्हायरसमध्ये देखील दिसतात. या भागांवर हल्ला करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्तीला प्रशिक्षण देऊन, ते लसीमध्ये प्रतिनिधित्व न केलेल्या इतर कोरोना व्हायरसपासून संरक्षण प्रदान करते, ज्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.
ते म्हणाले, आम्हाला कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची वाट पाहण्याची गरज नाही. रिपोर्टचे वरिष्ठ लेखक आणि केंब्रिज विद्यापीठातील फार्माकोलॉजी विभागातील प्राध्यापक मार्क हॉवर्थ म्हणाले की, आम्हाला कोरोना आणि त्यांच्याविरुद्धच्या विविध प्रतिकारशक्तीबद्दल पुरेशी माहिती आहे. आता आपण कोरोनाविरूद्ध संरक्षणात्मक लस तयार करू शकतो.
गेल्या साथीच्या काळात शास्त्रज्ञांनी एक अत्यंत प्रभावी कोविड लस त्वरीत तयार करण्यात मोठे काम केले आहे, परंतु जग अजूनही मोठ्या संख्येने मृत्यूसह मोठ्या संकटाचा सामना करत आहे. भविष्यात आपण आणखी चांगले कसे करू शकतो यावर आपल्याला काम करणे आवश्यक आहे आणि यातील एक शक्तिशाली घटक आधीच लस बनवू लागला आहे.
नवीन 'क्वार्टेट नॅनोकेज' लस नॅनोपार्टिकल नावाच्या संरचनेवर आधारित आहे. लेटेस्ट स्ट़डीमध्ये असे दिसून आले आहे की नवीन लस व्यापक रोगप्रतिकारक प्रतिसाद वाढवते. त्या उंदरांमध्येही प्रतिकारशक्ती वाढल्याचे दिसून आले आहे. नवीन लस सध्या उपलब्ध असलेल्या इतरांच्या तुलनेत डिझाइनमध्ये अगदी सोपी आहे. संशोधकांचा असा विश्वास आहे की क्लिनिकल चाचण्यांमध्ये ते वेगाने पुढे गेले पाहिजे.
ऑक्सफर्ड आणि कॅलटेक ग्रुपने कोरोना व्हायरस विरूद्ध ऑल इन-वन लस विकसित करण्याच्या मागील कामात ही सुधारणा असल्याचं म्हटलं जातं. या नवीन संशोधनाला यूकेच्या बायोटेक्नॉलॉजी अँड बायोलॉजिकल सायन्सेस रिसर्च कौन्सिलने निधी दिला आहे.