नवी दिल्ली, दि. 13 - 200 रूपयांच्या नव्या नोटेनंतर सरकारने आता आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकार लवकरच 100 रूपयांचं नाणं चलनात आणणार आहे. याशिवाय 5 आणि 10 रूपयांचंही नवं नाणं जारी केली केलं जाणार आहे.
दोन्ही नाणी तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि एआयएडीएमके चे नेते डॉ. एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) यांच्या जयंतीनिमित्त जारी करण्यात येणार आहे. सरकार 100 आणि 5 रूपयांची नवी नाणी डॉ. एम. जी. रामचंद्रन यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत चलनात आणणार आहे.
100 रूपयांचे नवे नाणे 44 मिलिमिटरचे असून, त्याचे वजन 35 ग्रॅम इतके असणार आहे. नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभाचे चित्र दिसेल. या चित्राच्या खालच्या बाजूला सत्यमेव जयते ही अक्षरे झळकतील. तर, अशोक स्तंभाच्या एका बाजूला भारत तर, दुसऱ्या बाजूला इंडिया लिहिलेले असेल. दुसरीकडे 5 रुपयाच्या नाण्याचा आकार 23 मिलीमीटर असण्याची शक्यता आहे.
100 रुपयाच्या नाण्याची वैशिष्ट्ये- -100 रुपयांच्या नाण्याचा आकार 44 मिलीमीटर -हे नाणं चांदी, कॉपर, निकल आणि झिंक यांचं मिश्रण असणार आहे. -नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभाचे चित्र दिसेल. -या चित्राच्या खालच्या बाजूला सत्यमेव जयते ही अक्षरे झळकतील.
-अशोक स्तंभाच्या एका बाजूला भारत तर, दुसऱ्या बाजूला इंडिया लिहिलेले असेल.-वजन 35 ग्रॅम इतके असणार आहे. -दुसरीकडे 5 रुपयाच्या नाण्याचा आकार 23 मिलीमीटर असेल