शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
3
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
4
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
5
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
6
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
7
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?
8
सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
10
नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?
11
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
12
Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी
13
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
14
Girnar Parikrama 2024: 'या' पाच दिवसांतच गिरनारच्या जंगलात मिळतो प्रवेश; जेवढ्या यातना तेवढाच आनंद!
15
शरद पवारांवरील टीका 'मानसपुत्रा'च्या जिव्हारी; निषेध व्यक्त करत वळसे पाटलांनी खोतांना दिला इशारा
16
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
17
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
18
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
19
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
20
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...

नवा वाद : भाजप, लोजपाला वगळून नितीशकुमारांनी केला मंत्रिमंडळ विस्तार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2019 3:03 AM

आठही मंत्री जदयूचे : केंद्रातील अवमानाचा वचपा काढल्याची चर्चा

एस. पी. सिन्हा पाटणा : भाजप, लोक जनशक्ती पार्टी (लोजपा) या मित्रपक्षांना वगळून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रविवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला. मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेले आठही मंत्री जनता दल (यू)चे आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळ बनविताना मोदी सरकारने केलेल्या अपमानाचा जनता दल (यू)ने बिहारमध्ये अशा प्रकारे वचपा काढल्याची चर्चा आहे.

नितीशकुमार यांनी पत्रकारांना सांगितले की, राज्य मंत्रिमंडळात भाजपला एक जागा देऊ केली होती. या गोष्टीला दुजोरा देत बिहारचे उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी म्हणाले की, ही जागा नंतर भरण्याचे भाजपने ठरविले आहे.

नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात जनता दल (यू)ला एक मंत्रीपद देण्यात आले होते. मात्र संसदेत आमच्या पक्षाचे जितके सदस्य आहेत त्या तुलनेत मंत्रीपदे मिळाली पाहिजेत, अशी नितीशकुमार यांनी केलेली मागणी भाजपने मान्य केली नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय जनता दल (यू)ने घेतला होता. मात्र मोदींच्या व त्यांच्या मंत्र्यांच्या शपथविधीस नितीशकुमार हजर राहिले.

बिहारमध्ये जनता दल (यू) व भाजपचे आघाडी सरकार आहे. लोकसभा निवडणुकांत राज्यातील ४० पैकी भाजपने १७ व जनता दल (यू)ने १६ जागा जिंकल्या आहेत. मोदींच्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या कारकिर्दीतही जनता दल (यू) केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाला नव्हता.

कोणतेही मतभेद नाहीत, सर्व काही आलबेलयेत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप-जदयूमध्ये फूट पडेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. लोकसभा निवडणुकीत जास्त जागा मिळूनही मंत्रिमंडळात योग्य तो सन्मान न मिळाल्याने जदयूमध्ये नाराजी असल्याचे काही नेत्यांचे म्हणणे आहे.नितीशकुमार यांनी म्हटले की, भाजपसोबत सर्व काही आलबेल आहे. भाजप नेता आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनीही एनडीएमध्ये २०० टक्के ठीकठाक असल्याचा दावा केला आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून कोणताही वाद नाही. भाजप मंत्र्यांना विस्तारात समाविष्ट करण्याचे पक्ष नेतृत्वाने सध्या टाळले, असे टिष्ट्वट केले.

जातीपातीच्या गणितांचा विचारजातीपातीची गणिते लक्षात ठेवून बिहार मंत्रिमंडळाच्या विस्तारात मागासवर्गीय, उच्चवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागासलेले, दलित या वर्गांना प्रत्येकी दोन पदे दिली आहेत. २०२० साली होणाऱ्या राज्य विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. राज्यपाल लालजी टंडन यांनी नव्या आठ मंत्र्यांना रविवारी शपथ दिली. नितीशकुमार यांनी सत्तेवर आल्यानंतर केलेला हा दुसरा विस्तार आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदी