संरक्षण मंत्रालयानं सोमवारी देशाच्या नव्या लष्कर प्रमुखांच्या नावाची घोषणा केली. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे देशाचे नवे लष्कर प्रमुख असते. ते देशाचे २९ वे लष्कर प्रमुख जनरल एम.एम.नरवणे यांची जागा घेतील. ३० एप्रिल रोजी नरवणे हे आपला २८ महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील. आतापर्यंत इन्फन्ट्री, आर्मर्ड आणि आर्टिलरी अधिकारीच लष्कर प्रमुख बनले आहेत. परंतु इंजिनिअर्स कॉर्प्समधून लष्कर प्रमुख झालेले ते पहिलेच व्यक्ती आहेत.
यावर्षीच फेब्रुवारी महिन्यात लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती यांच्या जागी भारतीय लष्कराच्या व्हाईस चीफ ऑफिसर पदाची जबाबदारी स्वीकारली होती. नॅशनल डिफेन्स अकादमीचे माजी विद्यार्थी, मनोज पांडे यांना डिसेंबर १९८२ मध्ये कोअर ऑफ इंजिनिअर्समध्ये नियुक्त करण्यात आलं होतं. ते जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेसोबतच पल्लनवाला सेक्टरमध्ये ऑपरेशन पराक्रमदरम्यान, एका इंजिनिअर रेजिमेटचं नेतृत्व केलं होतं.
डिसेंबर २००१ मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन पराक्रम अंतर्गत त्यांनी सैनिक आणि हत्यारांना मोठ्या प्रमाणात पश्चिमी सीमेवर पोहोचवलं होतं. संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. आपल्या ३९ वर्षांच्या कारकिर्दीत लेफ्टनंट जनरल पांडे यांनी आपल्या ३९ वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत लेफ्टनंट जनरल पांडे यांनी वेस्टर्न थिएटरमध्ये इंजिनियर ब्रिगेड, नियंत्रण रेषेजवळ इन्फन्ट्री ब्रिगेड, लडाख सेक्टरमधील माउंटन डिव्हिजन आणि ईशान्येकडील कॉर्प्सचे नेतृत्व केलं आहे. ईस्टर्न कमांडचा पदभार स्वीकारण्यापूर्वी ते अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ होते.