नवी दिल्ली : अयोध्या येथील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाच्या खटल्याच्या सुनावणीसाठी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी पाच न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन केले आहे.त्यामध्ये सरन्यायाधीशांसह न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण व न्या. एस. अब्दुल नझीर आहेत. आधीच्या खंडपीठात मुस्लीम न्यायाधीश नसल्याबद्दल याआधी आश्चर्य व्यक्त झाले होते. आता न्या. एस. अब्दुल नझीर यांना घेण्यात आले.
अयोध्या खटल्यासाठी नवे खंडपीठ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 6:18 AM