- सुरेश भटेवरा, नवी दिल्लीमुंबई-अहमदाबाद पश्चिम द्रुतगती मार्गावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वसईजवळ ५ लेन रुंदीच्या ३.५ कि.मी. लांबीच्या उड्डाण पुलाला केंद्रीय भूतल परिवहन मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. या पुलाची निविदाप्रक्रिया सुरू असून, लवकरच या पुलाचे कामसुरू होईल. त्याचबरोबर वसई खाडीतून बोगदा काढून, वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग तयार करता येईल काय, याचे तांत्रिक सर्वेक्षण करण्याचे काम एका आंतरराष्ट्रीय कंपनीकडे सोपवण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी दिली.मुंबईसह महाराष्ट्रातील राष्ट्रीय महार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी गडकरी यांनी बुधवारी बैठकीचे बोलावली होती. बैठकीत मुंबई-अहमदाबाद महार्गावरील कोंडी तसेच मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिक पिंपळगावजवळील उड्डाणपुलाचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्याबाबत निर्णय घेण्यात आले. खासदार गोपाळ शेट्टी, आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. अहमदाबाद मार्गावरील कोंडी दूर करण्यासाठी भार्इंदरला अंडरपास करण्याचा निर्णयही बैठकीत झाला.खोळंबा वाचवा, काम अडवू नका; प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत सूचनाकेंद्रातील महाराष्ट्र केडरच्या २0१४ बॅचच्या १८ आयएएस अधिकाऱ्यांचीही गडकरींनी स्वतंत्र बैठक घेतली. मंगळवारी रात्री झालेल्या या बैठकीला संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे व सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते. महाराष्ट्रातील सार्वजनिक कामांना वेग द्या, प्रशासकीय निर्णयांमुळे होणारा खोळंबा वाचवा, कोणतेही काम अडवू नका, अशा सूचना या बैठकीत गडकरींनी दिल्या.रामदास आठवले अधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले की, सामाजिक न्यायाची कामे वेगाने केली तर सरकारची प्रतिमा उजळेल. सुभाष भामरेंनीही बैठकीत मार्गदर्शन केले.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर नवा पूल
By admin | Published: October 27, 2016 2:40 AM