जि.प.उभारणार नव्या इमारती व १०० गावांमध्ये शौचालये
By admin | Published: January 02, 2016 8:32 AM
जळगाव- जिल्हा परिषद केंद्रीय व राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेणार आहे. ते तडीस नेण्यासाठी कार्यवाही सुरू झाली असून, नवीन इमारती, शौचालये उभारण्याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे.
जळगाव- जिल्हा परिषद केंद्रीय व राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेणार आहे. ते तडीस नेण्यासाठी कार्यवाही सुरू झाली असून, नवीन इमारती, शौचालये उभारण्याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे. पं.स.चे स्थलांतर शक्यया वर्षात पंचायत समितीचे जुन्या जिल्हा परिषद इमारतीमधील कार्यालय शिवतीर्थ मैदानावरील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेल्या दिलेल्या इमारतीमध्ये स्थलांतरित केले जाऊ शकते. शिवतीर्थची तटबंदीशहराचे हृदय समजल्या जाणार्या जिल्हा पेठेत जि.प.च्या मालकीचे सात एकर एवढे शिवतीर्थ मैदान आहे. या मैदानात होणारी अतिक्रमणे रोखण्यासह सुरक्षेच्या दृष्टीने या मैदानाभोवती संरक्षण भिंत व तारकुंपण करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. तो याच वर्षात प्रत्यक्षात येऊ शकतो. चार मजली जि.प.जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीवर चौथा मजला बांधण्यासंबंधीदेखील बांधकाम तज्ज्ञांशी चर्चा सुरू आहे. राज्य शासनाच्या इमारत विस्तार निधीमधून त्यासाठी पैसा उपलब्ध करून घेतला जाणार आहे. चौथ्या मजल्यावर लहान सभागृह व चार विभागांची कार्यालये उभारली जाऊ शकतात.तीन पं.स.ना नव्या इमारतीजिल्ह्यात मुक्ताईनगर, भुसावळ व चोपडा पं.स.साठी नवीन इमारती उभारण्यासंबंधीदेखील कार्यवाही सुरू आहे. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे काम बांधकाम विभागातर्फे सुरू आहे. १०० गावे हगदणरीमुक्त होतीलनवीन वर्षात ८५ टक्क्यांवर शौचालये असलेल गावात नवीन शौचालये निर्माण करून संबंधित गावे हगणदरीमुक्त केले जातील. त्यासंबंधी जि.प.प्रशासनाने संकल्प केला आहे. विहिरींसाठी अनुकूलताजवाहर विहिरींचे काम जि.प.ने शासनादेशांना बांधील राहून बंद केले. पण आता रोजगार हमी योजनेतून विहिरी घेता येतील. त्यासाठी प्रथम मंजूर विहिरींचे कामे पूर्ण करा नंतरच संबंधित गावात विहिर मंजूर करा, असा निर्णय घेण्यात आला आहे. या वर्षात सुमारे ३०० नवीन विहिरी निर्माण होऊ शकतील.