नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाने २०२० मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी नवी गुणपद्धती जारी केली आहे. सीबीएसईच्या दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणत्या परीक्षेत किती गुण गरजेचे आहेत, हे यात स्पष्ट केले आहे. सीबीएसई बोर्डाने एक निवेदन जारी करून त्यात या सर्व बाबी स्पष्ट केल्या आहेत. बहुतांश विषयांत दोन ते तीन प्रकारे गुण मिळवले जातात. त्यात थिअरी, प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट/इंटरनल असेसमेंट यांचा समावेश होतो. त्यात सर्वांत जास्त गुण थिअरी परीक्षासाठी असतात.आता बोर्डाने प्रत्येक विषयातील परीक्षेत पास होण्यासाठी किती गुण गरजेचे आहेत, हे सांगितले आहे. बारावी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना थिअरी व प्रॅक्टिकल/प्रोजेक्ट/इंटरनल परीक्षा यात ३३-३३ गुण असणे अनिवार्य केले आहे. म्हणजे केवळ थिअरीतच नाही तर बोर्डाच्या एखाद्या विषयासाठी होणाºया सर्व परीक्षेत ३३ टक्के गुण असणे अनिवार्य केले आहे. याशिवाय एकूण प्रत्येक विषयात ३३ टक्के गुण असणे गरजेचे आहे.>दहावीतील नवीन गुणपद्धतीसीबीएसई बोर्डाने म्हटले आहे की, दहावीत पास होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात एकूण ३३ टक्के गुण असण्याबरोबरच थिअरी, प्रॅक्टिकल/इंटरनल असेसमेंटमध्येही स्वतंत्ररीत्या प्रत्येकी ३३ टक्के गुण अनिवार्य आहेत.>दोन्ही वर्गांसाठी थिअरी परीक्षा सीबीएसई स्वत: आयोजित करते. तसेच प्रॅक्टिकल/प्रोजेक्ट/इंटरनल असेसमेंट शाळांकडून केले जाईल.यातही प्रोजेक्ट व प्रॅक्टिकलसाठी परीक्षक शाळेबाहेरील असतील. तथापि, इंटरनल असेसमेंट पूर्णपणे शाळेकडूनच केले जाईल.
‘सीबीएसई’ची दहावी, बारावीसाठी नवी गुणपद्धती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 6:11 AM