शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

मद्यपींना खर्चाची किक बसण्याची शक्यता; दारुवर 'काऊ सेस' लागणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2018 4:39 PM

दारुवर अधिभार लावण्याचा प्रस्ताव विचाराधीन

जयपूर: गायींच्या सुरक्षेसाठी महसूल गोळा करण्यासाठी राजस्थान सरकार दारुवर 'काऊ सेस' लावण्याच्या विचारात आहे. त्यामुळे मद्यपींना खर्चाची किक बसणार आहे. गोसंरक्षण आणि गोसंवर्धनासाठी दारुवर अधिभार लावण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे दारु आणखी महाग होईल. गायींच्या सुरक्षेसाठी स्टॅम्प ड्युटीवरील अधिभार दुप्पट करण्याचा विचार राजस्थान सरकारनं सुरू केला आहे. हा प्रस्ताव विचाराधीन असताना आता दारुवरही काऊ सेस लावण्याचा नवा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. राजस्थानात या वर्षाच्या अखेरीस विधानसभेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर स्टॅम्प ड्युटी आणि दारुवर अधिभार लावण्याचा निर्णय सरकारसाठी डोकेदुखी ठरु शकतो. स्टॅम्प ड्युटी आणि दारुवर अधिभार लावण्याच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री वसुंधरा राजे घेणार आहेत. दारुच्या प्रकारावरुन अधिभार किती लावण्यात येणार येईल, याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सरकारमधील सूत्रांनी दिली. यामुळे मद्यपींच्या खर्चात वाढ होईल, असंही सूत्रांनी सांगितलं. मात्र अद्याप या प्रस्तावावर अंतिम निर्णय व्हायचा आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यातही मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी भाडे कराराशी संबंधित कागदपत्रांवर 10 टक्के अधिभार लावण्याचा निर्णय घेतला होता. यामधून मिळणारा महसूल गायींच्या संरक्षणासाठी वापरण्यात येणार असल्याचं त्यावेळी सरकारनं सांगितलं होतं.  

टॅग्स :Rajasthanराजस्थान