शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

अमेरिकेसोबत नवा अध्याय सुरू होईल

By admin | Published: September 26, 2014 5:04 AM

अमेरिका हा भारताचा महत्त्वपूर्ण भागीदार देश असून या देशाच्या दौऱ्यामुळे दुरावा बऱ्याच प्रमाणात संपुष्टात आणण्यात मदत होईल

नवी दिल्ली : अमेरिका हा भारताचा महत्त्वपूर्ण भागीदार देश असून या देशाच्या दौऱ्यामुळे दुरावा बऱ्याच प्रमाणात संपुष्टात आणण्यात मदत होईल, व्यूहरचनात्मक संबंधात नवा अध्याय सुरू होईल, अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी गुरुवारी पाच दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी दिलेल्या निवेदनात या भेटीचा उद्देश स्पष्ट केला.द्विपक्षीय, तसेच वैश्विक हिताच्या दृष्टिकोनातून दोन देशांचे संबंध नव्या उंचीवर कसे नेता येतील, याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबतच्या चर्चेत भर दिला जाईल. ओबामा यांचा जीवनप्रवास लोकशाही व्यवस्थेत सर्वसामान्यांना उपलब्ध झालेले अधिकार आणि संधीचे उल्लेखनीय असे उदाहरण ठरते. जगभरातील लोकांसाठी त्यांचे आयुष्य प्रेरणादायी आहे, असे मोदींनी ओबामा यांची प्रशंसा करताना म्हटले. भारताच्या राष्ट्रीय विकासासाठी मी अमेरिकेकडे महत्त्वपूर्ण भागीदार म्हणून बघतो. दोन देशांदरम्यान शिक्षण, कौशल्य विकास, संशोधन, तंत्रज्ञान आणि नवप्रक्रियेत भागीदारीच्या अधिकाधिक शक्यता आहेत. त्याहीपेक्षा दोन देश मानवी मूल्य जपण्यासाठी कटिबद्ध आहेत, असे ते म्हणाले. मोदी शनिवारी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्राच्या ६९ व्या महाअधिवेशनाला संबोधित करतील. जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदी, जगाच्या अनेक भागात असलेला तणाव आणि संकट, दहशतवादी कारवायांमध्ये वाढ आणि विस्तार, आफ्रिकेतील इबोला विषाणूंचे संकट, वातावरण बदल, तसेच दारिद्र्य निर्मूलनासाठी जागतिक कटिबद्धता आणि अधिक समन्वयासोबत बहुआयामी कृतीवर भाषणात भर देणार असल्याचे त्यांनी नमूद केले. २०१५ नंतरच्या काळासाठी वृद्धी, विकास आणि दारिद्र्य निर्मूलनावर लक्ष केंद्रित करणारा जागतिक विकासाचा अजेंडा त्वरित स्वीकारला जावा, असे आवाहनही मोदी करणार आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)