शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

New Corona Virus in India: नवा व्हायरस भारतात पोहोचला? ओमायक्रॉन-डेल्टाचे संशयित रुग्ण महाराष्ट्रासह या राज्यांत सापडले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 7:44 AM

New Corona Virus in India: देशात गेल्या काही दिवसांपासून दोन हजारांच्या आसपास कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. हा आकडा कोरोना नियंत्रणात असल्याचे दाखवत असला तरी चीन, हाँगकाँगसारख्या देशामधील लाखांत होत असलेली रुग्णवाढ चांगले संकेत देत नाहीय.

देशात गेल्या काही दिवसांपासून दोन हजारांच्या आसपास कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. हा आकडा कोरोना नियंत्रणात असल्याचे दाखवत असला तरी चीन, हाँगकाँगसारख्या देशामधील लाखांत होत असलेली रुग्णवाढ चांगले संकेत देत नाहीय. यामुळे भारत सरकारने राज्यांना कोरोना रुग्णांवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. यात नव्या व्हायरसने हजेरी लावल्याचे दिसले आहे. 

कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिअंटने डेल्टा आणि ओमायक्रॉनपासून बनलेला डेल्टाक्रॉन (Deltacron) भारतात पोहोचला आहे. काही राज्यांत या व्हेरिअंटचे संशयित रुग्ण समोर आले आहेत. तेलंगाना टुडेच्या हवाल्याने मनी कंट्रोलने याबाबतचे वृत्त दिले आहे. भारताच्या कोविड जिनेमिक्स कंसोर्टियम (INSACOG) आणि GSAID ने इशारा दिला आहे की, देशात डेल्टाक्रॉनचे 568 रुग्ण तपासणीच्या टप्प्यात आहेत. 

कर्नाटकात 221 डेल्टाक़्रॉनने बाधित रुग्ण सापडल्याचे संकेत मिळत आहेत. तिथे हॉटस्पॉट बनला आहे. यानंतर तामिळनाडू 90, महाराष्ट्र 66, गुजरात 33, पश्चिम बंगाल, तेलंगाना 25, नवी दिल्ली 20 रुग्णांचे सॅम्पल तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. 

तज्ञांच्या मते, हा एक सुपर सुपर-म्युटंट व्हायरस आहे, ज्याचे वैज्ञानिक नाव BA.1 + B.1.617.2 आहे. तज्ञांनी सांगितले आहे की डेल्टा आणि ओमायक्रॉनचा बनलेला एक संकरित स्ट्रेन आहे, जो गेल्या महिन्यात सायप्रसमधील संशोधकांनी पहिल्यांदा शोधला होता. त्यावेळी शास्त्रज्ञांनी ही प्रयोगशाळेतील तांत्रिक चूक असल्याचे मानले. पण आता ब्रिटनमध्ये रुग्ण समोर येत आहेत. डेल्टाक्रॉन हा कोरोना विषाणूचा एक संकरित प्रकार आहे जो डेल्टा आणि ओमायक्रॉन पासून बनला आहे. 

किती खतरनाक...शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की डेल्टा आणि ओमायक्रॉन पासून बनलेला नवीन विषाणू किती धोकादायक आहे याबद्दल अनेक संशोधने सुरू आहेत. अहवालानुसार, या विषाणूचा प्रादुर्भाव फ्रान्समध्ये जानेवारी 2022 मध्ये सुरू झाला आणि पहिला रुग्ण आढळला. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) म्हणते की ओमायक्रॉन आणि डेल्टा रीकॉम्बिनंट विषाणू पसरत आहेत. डब्ल्यूएचओ शास्त्रज्ञ मारिया व्हॅन कारखोव्ह यांनी म्हटले आहे की SARSCov2 चे ओमायक्रॉन आणि डेल्टा प्रकार एकत्र पसरण्याची शक्यता आहे. त्यांचे संक्रमण वेगवान असू शकते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन