शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
2
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
3
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
4
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
5
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
6
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
7
धक्कादायक! गणवेश परिधान करून न आल्याने शिक्षकाकडून विद्यार्थ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण
8
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
9
रिया चक्रवर्ती हाजिर हो... ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीला पोलिसांचे समन्स
10
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
11
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
12
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
13
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
14
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
15
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
16
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
17
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
18
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
19
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
20
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले

डेटिंग ॲप की हाॅटेलिंग स्कॅम? महागड्या हॉटेलमधील नवा स्कॅम समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2024 12:09 PM

मुद्द्याची गोष्ट : महानगरांमध्ये डेटिंग ॲपमधून एक नवे स्कॅम उघडकीस आले आहे. खा, प्या अन् चुना लावून कलटी मारा, असा हा प्रकार आहे. सावजाला ठरावीक कॅफे किंवा पबमध्ये डेटवर बाेलाविले जाते. बिल तरुणाच्या माथी मारले जाते.

मनोज रमेश जोशी

एकटेपणा घालवण्यासाठी अनेक जण डेटिंग ॲपची मदत घेतात. गेल्या काही वर्षांमध्ये अशाप्रकारची अनेक डेटिंग ॲप्स उदयास आली आहेत. तारा जुळल्या की एखादी छानशी डेट प्लॅन करावी, असे अनेकांना वाटते. तरुणांसाेबत मध्यमवयीन लाेकांची यात संख्या जास्त आहे; मात्र सुरुवातीला गाेडगाेड बाेलणारी ‘डेट’ तुम्हाला चांगलेच गाेत्यात घालू शकते. डेटिंग ॲपच्या माध्यमातून खा, प्या आणि कलटी मारा... अशा प्रकारचे स्कॅम वाढत आहेत. महागड्या हाॅटेलमध्ये भेटायला बाेलाविणे. मेन्यूमध्ये नसलेली महागडी पेये ऑर्डर करायची. ते पिऊन काही तरी कारण सांगून तिथून कलटी मारून. भरमसाठ बिल पीडिताच्या माथी मारणे. अशाप्रकारे हे स्कॅम ऑपरेट केले जाते. नंतर ती तरुणी नंबर ब्लाॅक करते. तिचा पुढे संपर्क हाेतच नाही; पण ताेपर्यंत ४० ते ५० हजारांचा चुना लागलेला असताे. ते पैसे देण्याशिवाय पर्याय नसताे.

घटना १ - स्पर्धा परीक्षा देण्यासाठी दिल्लीत आलेला तरुण डेटिंग ॲपवर एका तरुणीला भेटतो. नंतर त्यांचा व्हाॅट्सॲपवर संवाद सुरू हाेताे. लवकरच दाेघे भेटायचे ठरवतात. ती त्याला एका ठराविक परिसरात भेटायचा आग्रह करते. कारण, तेथे अनेक चांगले कॅफे आणि पब्स आहेत. दाेघे भेटतात. गप्पा रंगतात. दाेघे काही खाण्यापिण्याचे पदार्थ ऑर्डर करतात. नंतर ती मेन्यूकार्डमध्ये नसलेला एखादा अतिशय महागडा पदार्थ ऑर्डर करते. काही मिनिटांमध्ये अचानक ती काही तरी अघटित घडल्याचा बनाव करते आणि निघून जाते. थाेड्यावेळात बिल येते. ते पाहून तरुणाचे डाेळे पांढरे व्हायची वेळ येते. हे बिल १ लाख २० हजारांचे असते. 

घटना २ - ही घटना मुंबईत घडली. पीडित तरुणाला एका डेटिंग ॲपवर तरुणी भेटली. ती त्याला एका ठराविक पबमध्ये बाेलाविते. ती काही तरी कारण सांगून निघून जाते. त्याला पबमालक बिल देताे जवळपास ४५ हजार रुपयांचे! या बिलाचा फाेटाे पीडित तरुणाने शेअर केला आहे. त्याने याप्रकरणी पाेलिसांनाही बाेलाविले हाेते; पण फक्त ४ हजार रुपये कमी करण्यात आले. त्यांना ४० हजार रुपयांचे बिलाचे पैसे द्यावेच लागले.घटना ३ - एका डेटिंग ॲपवर तरुणाची एका तरुणीसाेबत ओळख झाली. दाेघांनी भेटायचे ठरविले. तिने सांगितलेल्या एका कॅफेमध्ये दाेघे भेटले. तिथे काही जाेडपी फटाके फाेडत हाेती. त्यांच्याकडे खास असे अनार हाेते. तिनेही त्याच्याकडे अनारसाठी हट्ट धरला. नंतर बिल मागविले. फटाक्याचे बिल किती यावे? तब्बल ४५ हजार. ती तरुणी बहाणा सांगून निघून गेली हाेती. आपण फसलाे, हे त्याला कळाले हाेते.

अशी हाेते फसवणूक...दिल्लीत घडलेल्या प्रकरणात पाेलिसांनी कॅफेचा मालक अक्षय पाहवा आणि ‘डेट’ अफसान परवीन यांना अटक केली.

या रॅकेटमध्ये कॅफेचे मालक, व्यवस्थापक, वेटर्स आणि अनेक महिलांचा समावेश असताे. या सर्वांचा बिलाच्या रकमेतील वाटा ठरलेला असताे. 

एक महिला दरराेज असे किमान दाेन जणांना चुना लावते.

एकच क्लब, नावे वेगवेगळी

हैदराबादमध्ये असेच एक डेटिंग रॅकेट पाेलिसांनी उद्ध्वस्त केले. त्यात धक्कादायक माहिती समाेर आली. सावज जाळ्यात अडकाविण्याची पद्धत सारखीच. पण, एकाच कॅफेचे नाव बदलत हाेते. एकाच महिलेने तीन जणांना फसवले हाेते. बिलाची रक्कम २० ते ४० हजारांच्यादरम्यान हाेती. हा कॅफे पुढे बंद असल्याचे पाेलिसांच्या तपासणीत आढळले. 

घाबरू नका, तक्रार करा 

अनेक जण फसवणूक झाल्यानंतर बदनामीच्या भीतीने पाेलिसांकडे तक्रार करत नाहीत; मात्र न घाबरता पाेलिसांकडे तक्रार नाेंदवायला हवी. दिल्लीच्या घटनेत कॅफेचा मालक आणि तरुणीला अटक झाली. तरुण स्वत: स्पर्धा परीक्षेची तयारी करत हाेता. त्यामुळे ताे घाबरला नाही. डेटिंग ॲपवर काेणालाही भेटताना सावध राहायला हवे. केवळ पुरुषच नव्हे, तर महिलादेखील जाळ्यात अडकलेल्या आहेत.

फसू नका, असे स्मार्ट बनाएका तरुणाने साेशल मीडियावर एक किस्सा शेअर केला आहे. डेटिंग ॲपवर ओळख झाल्यानंतर महिले त्याला अचानक १ हजार रुपये उधारीवर मागितले. त्याला संशय आला. त्याने पैसे पाठवत असल्याचे भासवत लगेच तिला ब्लाॅक केले.

काेणाचा किती वाटा?

१५% रक्कम सावज हेरणाऱ्या महिलेला.४५% रक्कम व्यवस्थापक व वेटर्स घेतात.४०% रक्कम कॅफे मालक ठेवताे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजी