दिल्लीतील ३ नगर पालिकांकडून येत्या काही दिवसात अटल रसोईच्या माध्यमातून गोरगरिबांची भूक भागवण्याची तयारी सुरू आहे. अटल रसोई या योजनेअंतर्गत ६० वेगववेगळ्या भागांमध्ये फक्त १० रूपयात पोटभर जेवण मिळणार आहे. स्थानिक माध्यमांद्वारे समोर आलेल्या माहितीनुसार दिल्लीतील तीन नगर पालिका क्षेत्रांमध्ये अटल रसोई सुरू करण्याचे काम वेगानं सुरू आहे. योजनेनुसार दक्षिण दिल्लीतील पालिका क्षेत्रात ४०, उत्तर दिल्ली नगर पालिकांमध्ये २० ठिकाणी अटल भोजन दिलं जाणार आहे. याअंतर्गत ठिकठिकाणी गोरगरिबांना फक्त १० रूपयात जेवण पुरवलं जाणार आहे.
तीन वर्षांपूर्वी दिलं होतं अटल रसोई उघडण्याचं आश्वासन
२०१७ मध्ये दिल्लीतील पालिका निवडणूकांच्यावेळी भाजपकडून अटल रसोईच्या माध्यमातून १० रूपयात जेवण देण्याचे आश्वासन देण्यात आलं होतं. २०१८ मध्ये अटल आहारकेंद्र उघडण्यात आलं होतं. पण याचा विस्तार करण्यापूर्वीच कोरोना व्हायरसनं हात पाय पसरायला सुरूवात केली. त्यामुळे अटल रसोई बंद पडली. बापरे! वेळेच्या २ मिनिटं आधीच ऑफिस सोडलं म्हणून सरकारी कामगाराचा कापला पगार अन्....
दरम्यान भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार गौतम गंभीर यांनी 'जन रसोई' भोजनाची सुरुवात केली होती. 'जन रसोई' आपल्या संसदीय मतदार संघाद्वारे पूर्व दिल्लीतील गरजू लोकांना 1 रुपयात जेवणाची सुविधा देत आहे. गौतम गंभीर यांनी गांधी नगरमध्ये यापूर्वीच आहारकेंद्र सुरू केले असून त्यानंतर प्रजासत्ताक दिनी अशोक नगरमध्येही असेच आहारकेंद्र सुरू करण्यात आले आहे. गौतम गंभीर फाऊंडेशनच्या या दोन्ही जन रसोई कॅन्टिनद्वारे दररोज जवळपास २ हजार लोकांना स्वच्छ आणि पौष्टीक अन्न मिळणार आहे. पोट भरलेलं असेल तर जगातील कोणत्याही ताकदीशी आपण लढू शकू, असं त्यांनी उद्घाटनादरम्यान सांगितलं होतं. 'ही' तरूणी आहे लेडी 'गजनी', गर्लफ्रेन्ड आणि परिवाराचीही तिला राहत नाही आठवण!
डिसेंबर महिन्यात पहिल्यांदा सुरूवात
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात गौतम गंभीर यांनी आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून दिल्लीतील गांधीनगर येथे जन रसोईची सुरूवात केली होती. याअंतर्गत लोकांना केवळ एका रूपयात भोजनाचा आस्वाद घेता येतो. कोरोना महासाथीच्या दरम्यान सुरू करण्यात आलेल्या या जन रसोईमध्ये सर्व नियमांचं पालनही केलं जात आहे. तसंच जेवण तयार करण्यापूर्वी संपूर्ण जागाही सॅनिटाईझ करण्यात येते. यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या जन रसोईमध्ये २५ जानेवारी २०२१ पर्यंत एका रूपयात जवळपास ३० हजार लोकांनी भोजनाचा आस्वाद घेतला होता. गौतम गंभीर फाऊंडेशन 'फुड फॉर ऑल' या अंतर्गत दिल्लीत एका रूपयात जेवण उपलब्ध करून देत आहे.