नवी दिल्ली : चाकू घेऊन केरळच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न, युवक पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2018 01:22 PM2018-08-04T13:22:59+5:302018-08-04T16:29:03+5:30
चाकू घेऊन एका व्यक्तीनं केरळ हाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला.
नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीतील केरळ भवनात एक माथेफिरु व्यक्ती चाकू घेऊन शिरला होता. या घटनेमुळे परिसरात काही वेळ गोंधळ उडाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, या माथेफिरुच्या एका हातात चाकू तर दुसऱ्या हातात काही कागदपत्रं होती. केरळचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांची भेट घेण्यासाठी हा माथेफिरू चाकू हातात घेऊन केरळ भवनात दाखल झाला होता. घटनास्थळी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला पाहताच रोखलं आणि ताब्यात घेतलं. मात्र, या घटनेमुळे खूपच गोंधळ निर्माण झाला होता.
ताब्यात घेतलेला व्यक्ती हा मानसिकरित्या तणावात असल्याचे म्हटले जात आहे. विमल राज असे त्यांचे नाव असून ते 46 वर्षांचे आहेत. दरम्यान, विमल राज यांना उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून वैद्यकीय तपासणीनंतर त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.
Man tried to barge inside Kerala House in Delhi with a knife today. Kerala Chief Minister Pinarayi Vijayan was present inside. Police says, 'the man is 80% mentally unstable & has been sent to Institute of Human Behaviour and Allied Sciences'. pic.twitter.com/VpsTBsNiX7
— ANI (@ANI) August 4, 2018
#WATCH: Man tries to barge inside Kerala House in Delhi with a knife. Kerala Chief Minister Pinarayi Vijayan was present inside. Police says, 'the man is 80% mentally unstable & has been sent to Institute of Human Behaviour and Allied Sciences'. pic.twitter.com/j2frHaYBUY
— ANI (@ANI) August 4, 2018