16 Feb, 25 02:29 PM
दिल्लीच्या रेल्वे प्लॅटफॉर्म नं. १६ वर पुन्हा गर्दी वाढू लागली
चेंगराचेंगरीनंतर लोकांचे बूट, फाटलेल्या पिशव्या आणि कपडे विखुरलेले असताना रेल्वे कर्मचाऱ्यांनी रात्रभर प्लॅटफॉर्म स्वच्छ केला होता. या चेंगराचेंगरीला काही तास होत नाही तोच पुन्हा प्लॅटफॉर्म नंबर १६ वर गर्दी होऊ लागली आहे. लोक मिळेल त्या वाटेने, खिडक्यांतून देखील आत घुसू लागले आहेत.
16 Feb, 25 01:12 PM
रेल्वेच्या चौकशी समितीने चेंगराचेंगरीचे सर्व व्हिडिओ सुरक्षित करण्याचे आदेश दिले.
रेल्वेच्या चौकशी समितीने चेंगराचेंगरीचे सर्व व्हिडिओ सुरक्षित करण्याचे आदेश दिले.
16 Feb, 25 12:35 PM
आरपीएफ अधिकारी घटनेची माहिती घेत आहेत
चेंगराचेंगरी प्रकरणात रेल्वे प्रशासन सक्रिय झाले असून पथकांनी तपास सुरू केला आहे. रविवारी दुपारी आरपीएफ आयजीसह वरिष्ठ अधिकारी प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर पोहोचले. अपघात कसा झाला? या संदर्भात आयजींना माहिती देण्यात आली. चेंगराचेंगरी झालेल्या पायऱ्यांवरच आयजींसह वरिष्ठ रेल्वे अधिकारी पोहोचले. आयजी हे रेल्वेने चौकशीसाठी स्थापन केलेल्या मंडळाचे सदस्य आहेत.
16 Feb, 25 12:25 PM
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक
रविवारी सकाळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी पोहोचले. त्यांनी गृहमंत्र्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर ते रेल्वे मंत्रालयात पोहोचले आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत. दरम्यान, रेल्वेकडून उच्चस्तरीय चौकशी सुरू झाल्याची बातमी आहे. सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सील करून सुरक्षित करण्यात आले आहेत. मुख्य सुरक्षा आयुक्त पंकज गंगवार आणि प्रिन्सिपल चीफ कमर्शियल मॅनेजर नरसिंग दास हे तपास पथकाचे नेतृत्व करतील.
16 Feb, 25 12:24 PM
१५ डॉक्टरांकडून जखमींवर उपचार
बहुतेक जखमींना शरीराच्या खालच्या बाजूला जखमा झाल्या आहेत. काहींना हाडांना दुखापत झाली आहे. चार जणांवर देखरेख ठेवण्यात आली आहे. उर्वरितांना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले. बहुतेक रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. जखमींवर १५ डॉक्टरांची टीम उपचार करत आहे.
16 Feb, 25 10:17 AM
'मी हा मुद्दा संसदेत उपस्थित केला'; राघव चढ्ढा
आपचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा म्हणाले की, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील दुःखद चेंगराचेंगरीने आपल्या सर्वांना हादरवून टाकले आहे. महिला आणि मुलांसह अनेक निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही दुर्घटना म्हणजे घोर गैरव्यवस्थापन आणि गर्दी नियंत्रण उपाययोजनांच्या अभावाचे एक ज्वलंत उदाहरण आहे. ११ फेब्रुवारी रोजी मी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला आणि रेल्वे स्थानकांवर चांगल्या व्यवस्थापन प्रोटोकॉलची तातडीने गरज असल्याचा इशारा दिला, पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. पीडितांच्या कुटुंबियांना माझ्या मनापासून संवेदना. जबाबदार असलेल्यांना जबाबदार धरले पाहिजे आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी त्वरित सुधारणांची आवश्यकता आहे.
16 Feb, 25 10:17 AM
प्रवाशांना अचानक प्लॅटफॉर्म १४ वरून प्लॅटफॉर्म १६ वर पाठवले
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, लोक अचानक प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरून प्लॅटफॉर्म क्रमांक १६ वर जाऊ लागल्याने चेंगराचेंगरी झाली. सहसा, महाकुंभसाठी नियोजित विशेष गाड्या प्लॅटफॉर्म १४ आणि १६ वर येतात. महाकुंभाला जाणारी ट्रेन प्लॅटफॉर्म १४ वर उशिरा आली, त्यानंतर प्रयागराजहून एक ट्रेन प्लॅटफॉर्म १६ वर येत असल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी लोकांचा गोंधळ सुरू झाला. घटनास्थळी पोलिसांची संख्या कमी होती.
16 Feb, 25 10:08 AM
"गाड्यांच्या वेळेत कोणताही बदल..."; रेल्वेने स्पष्टीकरण दिले
अपघातानंतर लगेचच परिस्थिती सामान्य झाल्याचे रेल्वेने सांगितले. कोणतीही ट्रेन रद्द झाली नाही. गाड्यांच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आला नाही. कोणताही प्लॅटफॉर्म बदलला नाही. आम्ही अतिरिक्त विशेष गाड्या चालवल्या आहेत. त्या ठिकाणी सामान्य गर्दी होती. पादचारी पुलावरून एका प्रवाशाचा पाय घसरल्याने ही घटना घडली. आता परिस्थिती पूर्णपणे सामान्य आहे. गाड्यांचे कामकाज सुरळीत सुरू आहे.
16 Feb, 25 09:33 AM
दोषींवर कारवाई करावी; बसपा प्रमुख मायावती
बसपा प्रमुख मायावती यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. मायावती म्हणाल्या की, रेल्वेच्या गंभीर निष्काळजीपणामुळे, प्रयागराज महाकुंभाला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर जमलेल्या प्रचंड गर्दीत चेंगराचेंगरी झाली. यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले आणि जखमी झाले. ही घटना खूप दुःखद आहे. सरकारने दोषींवर कारवाई करावी आणि पीडितांना पूर्ण मदत करावी.
16 Feb, 25 08:38 AM
चेंगराचेंगरीचे कारण आले समोर
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीचे नेमकी कशामुळे झाली याचे कारण अजूनही समोर आलेले नाही. दरम्यान आता याबाबतची एक माहिती समोर आली आहे. रेल्वे विभागाने एका विशेष ट्रेनची घोषणा केली होती. या घोषणेमुळे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी दावा केला जात आहे. एका सूत्राने दिलेल्या माहितीमुसार, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील गर्दी सतत वाढत होती. परिस्थिती अशी होती की एका तासात १५०० तिकिटे खरेदी केली जात होती. महाकुंभाला जाणाऱ्या लोकांची मोठी गर्दी होती. तर प्रयागराजला जाणाऱ्या दोन विशेष गाड्या उशिराने धावत होत्या. अशा परिस्थितीत, रेल्वेने आणखी एक विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आणि प्लॅटफॉर्म क्रमांक १६ वरून निघण्याची घोषणा केली. दुसरीकडे, इतर प्लॅटफॉर्मवर वाट पाहणाऱ्या लोकांनी विशेष ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १६ वर जाण्याचा प्रयत्न सुरू केला. यावेळी ही चेंगराचेंगरी झाल्याचे समोर आले आहे.
16 Feb, 25 09:05 AM
रेल्वेने अपघातग्रस्तांना मदत जाहीर केली
रेल्वे प्रशासनाने चेंगराचेंगरी प्रकरणात अपघातग्रस्तांना भरपाई जाहीर केली आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची भरपाई दिली जात आहे. तर गंभीर जखमींना अडीच लाख रुपये दिले जात आहेत. याशिवाय, किरकोळ जखमींना १ लाख रुपयांची भरपाई दिली जात आहे.
16 Feb, 25 09:02 AM
रेल्वेने अपघातग्रस्तांना मदत जाहीर केली
रेल्वे प्रशासनाने चेंगराचेंगरी प्रकरणात अपघातग्रस्तांना भरपाई जाहीर केली आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची भरपाई दिली जात आहे. तर गंभीर जखमींना अडीच लाख रुपये दिले जात आहेत. याशिवाय, किरकोळ जखमींना १ लाख रुपयांची भरपाई दिली जात आहे.
16 Feb, 25 08:56 AM
आरपीएफच्या जवानांची संख्या कमी होती
मिळेल्या माहितीनुसार, प्रयागराज रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने आरपीएफ जवानांना ड्युटीसाठी पाठवण्यात आले आहे. यामुळे अपघाताच्या वेळी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर आरपीएफ कर्मचाऱ्यांची संख्या कमी होती.
16 Feb, 25 08:53 AM
प्रियंका गांधींनी ट्विट करुन घटनेवर दु:ख व्यक्त केलं
काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, "नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत महिला आणि मुलांसह अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. देव मृतांच्या आत्म्यांना शांती देवो. शोकाकुल कुटुंबाबद्दल मला तीव्र संवेदना आहेत. जखमींना लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करते.
16 Feb, 25 08:47 AM
नवी दिल्ली रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरीवरून विरोधकांचा सवाल
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू आहे. तेथे जाण्यासाठी शनिवारी रात्रीच्या सुमारास नवी दिल्ली रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. यामुळे येथे चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडली. येथे झालेल्या चेंगराचेंगरीत १५ जणांचा मृत्यू झाल आहे. यात २ मुलांचाही समेश आहे. याशिवाय १० लोक गंभीर जखमी असल्याचेही समजते. प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि प्लॅटफॉर्म क्रमांक १६ जवळील एस्केलेटरजवळ ही चेंगराचेंगरी झाली. विरोधी पक्षांनी या दुर्घटनेसाठी केंद्र सरकारच्या गैरव्यवस्थापनाला जबाबदार धरले आहे.
अधिक बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
16 Feb, 25 08:45 AM
'पुन्हा एकदा रेल्वेचे अपयश उघड झाले': राहुल गांधी
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. राहुल यांनी इंस्टाग्रामवर लिहिले की, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक लोकांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आणि वेदनादायक आहे. मी शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीची आशा करतो. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वेचे अपयश आणि सरकारची असंवेदनशीलता अधोरेखित होते. प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता, स्थानकावर चांगली व्यवस्था करायला हवी होती. गैरव्यवस्थापन आणि निष्काळजीपणामुळे कोणालाही आपला जीव गमवावा लागू नये याची काळजी सरकार आणि प्रशासनाने घ्यावी.
16 Feb, 25 08:43 AM
PM मोदी-राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं दुःख
नवी दिल्लीरेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी आहेत. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत, नवी दिल्लीरेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे व्यथित झाल्याचे म्हटले आहे.
अधिक बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
16 Feb, 25 08:40 AM
'अशी गर्दी कधीच पाहिली नव्हती'
एका पोर्टरने सांगितले की, मी १९८१ पासून पोर्टर म्हणून काम करत आहे. मी यापूर्वी कधीही अशी गर्दी पाहिली नव्हती. प्रयागराज स्पेशल प्लॅटफॉर्म क्रमांक १२ वरून निघणार होती, परंतु ती प्लॅटफॉर्म क्रमांक १६ वर हलवण्यात आली. प्लॅटफॉर्म क्रमांक १२ वर वाट पाहणाऱ्या गर्दीने आणि बाहेर वाट पाहणाऱ्या गर्दीने प्लॅटफॉर्म १६ वर पोहोचण्याचा प्रयत्न केला तेव्हा लोक एकमेकांशी आदळू लागले आणि एस्केलेटर आणि पायऱ्यांवर पडले. गर्दी थांबवण्यासाठी अनेक पोर्टर तिथे जमले. आम्ही किमान १५ मृतदेह पाहिले आणि त्यांना रुग्णवाहिकेत ठेवले. प्लॅटफॉर्मवर सर्वत्र बूट आणि कपडे विखुरलेले होते. आम्ही पोलिसांना बोलावले, अग्निशमन दलाच्या गाड्या आणि ३-४ रुग्णवाहिका तिथे पोहोचल्या आणि लोकांना रुग्णालयात नेण्यात आले.