नवी दिल्ली- राफेल विमानांच्या खरेदीबाबत लोकसभेत प्रश्नचिन्ह उभे करण्यात आल्यानंतर आता या विमानांच्या किमतीबाबत नवा खुलासा करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या संपुआ सरकारपेक्षा प्रत्येक विमानाच्या खरेदीत 59 कोटी वाचवल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तसमुहाने प्रसिद्ध केली आहे. याचाच अर्थ प्रत्येक विमान 59 कोटी रुपयांनी स्वस्त दरात भारताला मिळणार आहे.नव्या खुलाशाप्रमाणे, मोदी सरकारने या व्यवहारामध्ये देशाचे भरपूर पैसे वाचवले आहेत. युपीए म्हणजेच संपुआ सरकारने 36 विमानांचा व्यवहार 1.69 लाख कोटी रुपयांमध्ये केला होता तर मोदी सरकारने ही विमाने केवळ 59 हजार कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्याचा व्यवहार केला आहे. म्हणजेच मोदी सरकारने प्रत्येक विमान 59 कोटी रुपये स्वस्त दरात मिळवले आहे. डॉ. मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळातील व्यवहारानुसार प्रत्येक विमान 1705 कोटी रुपयांना घेण्यात येणार होते तर मोदी सरकारने तेच विमान 1646 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले आहे. तसेच या विमानांमध्ये आधी व्यवहार केलेल्या विमानांपेक्षा 13 सोयी आणि वेगळी तंत्रज्ञाने वापरलेली आहेत. या सोयी इतर कोणत्याही देशांना देण्यात आलेल्या नाहीत.
Rafael Deal: मोदी सरकारने प्रत्येक विमानामागे वाचवले ५९ कोटी, मिळवली सर्वोत्तम 'क्वालिटी'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 11:33 AM