शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
2
डोनाल्ड ट्रम्पना आणखी एक मुलगी? पाकिस्तानातल्या तरुणीचा खळबळजनक दावा, Video व्हायरल
3
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
4
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन
6
IPL Auction 2025 : पाकिस्तानची वाट लावणारा IPL च्या लिलावात; अमेरिकेच्या दहा खेळाडूंनी केली नोंदणी
7
'ज्यांच्या घरावर बुलडोझर चालवला, त्यांना २५ लाख रुपये द्या'; सुप्रीम कोर्टाचे योगी सरकारला आदेश
8
"कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही"; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, "कधी काय बोलतील..."
9
Priyanka Gandhi : "मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र
10
“राहुल गांधीची भूमिका संविधान बचाओ, फडणवीसांना शहरी नक्षलवाद का वाटतो?”; काँग्रेसचा सवाल
11
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
12
'बविआ'समोर भाजपचे आव्हान! जागा शिंदेंच्या पण उमेदवार भाजपचे
13
"काहीही झालं तरी जातनिहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणारच"
14
"मी त्यांना नोटीस पाठवतो"; रामराजेंबाबत अजित पवारांना घेतली कठोर भूमिका, कारण...
15
'तो' एक फॉर्म्युला लागू झाल्यास परळीत धनंजय मुंडेंची होणार अडचण; नेमकं राजकारण काय?
16
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
17
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
18
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
19
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
20
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी

नवा वाद: उत्तराखंडमध्ये पुन्हा चीनची घुसखोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 5:30 AM

भारत-भूतान सीमेवरील डोकलामवर चीनच्या सैनिकांनी केलेल्या घुसखोरीमुळे निर्माण झालेला तणाव संपला नसतानाच, चीनच्या सैन्याने उत्तराखंडातील बाराहोटी भागात पुन्हा घुसखोरी केल्याचे उघडकीस

नवी दिल्ली : भारत-भूतान सीमेवरील डोकलामवर चीनच्या सैनिकांनी केलेल्या घुसखोरीमुळे निर्माण झालेला तणाव संपला नसतानाच, चीनच्या सैन्याने उत्तराखंडातील बाराहोटी भागात पुन्हा घुसखोरी केल्याचे उघडकीस आले आहे. चमोली जिल्ह्यातील बाराहोटी या सीमेजवळील गावात २५ जुलै रोजी चिनी सैन्य घुसले होते. सीमेपासून ८00 मीटर ते एक किलोमीटर आतपर्यंत ते घुसले होते.या घुसखोरीसंदर्भात भारत सरकारने प्रतिक्रिया दिलेली नाही. या भागात दोन्ही देशांचे सशस्त्र सैनिक असता कामा नये, असे ठरले असतानाही चीनच्या शस्त्रधारी सैनिकांनी इथे घुसखोरी केल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या सैनिकांनी तेथे असलेल्या मेंढपाळांना गाव सोडून जाण्यासाठी जबरदस्ती केली. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे हे सैनिक होते. यापूर्वीही उत्तराखंडमध्ये चीनने घुसखोरी केली होती.तैनात असतात नि:शस्त्र जवान-बाराहोटीमध्ये लष्कर असू नये, असे ठरले असल्याने तेथील इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलाच्या जवानांकडे शस्त्रे नसतात. भारत व चीन या दोन्ही देशांनी १९५८ साली बाराहोटी हे ठिकाण वादग्रस्त असल्याचे निश्चित केले होते.त्यामुळे १९६२ च्या भारताशी झालेल्या युद्धाच्या काळातही चीनचे सैनिक या भागात आले नव्हते. त्यांनी अरुणाचल प्रदेश व लडाख या भागांतच लक्ष केंद्रित केले होते.उत्तराखंडची राजधानी डेहराडूनपासून बाराहोटी हे ठिकाण १४0 किलोमीटर अंतरावर आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश व उत्तर प्रदेश या तीन राज्यांच्या सीमेपाशी हा भाग येतो.अनेक दिवसांपासून सुरू आहे वाक्युद्ध!-डोकलाममधून चीननेसैन्य मागे घ्यावे, अशी भारताची मागणी आहे, तर तो भाग आमचा असून, भारताने माघार घ्यावी, अन्यथा युद्धाची वेळही येऊ शकते, असा इशारा चीनने दिला आहे.