कुन्नुर : भारतीय हवाईदलानंतर आता भारतीय नौदलातही पहिली महिला वैमानिक भरारी घेणार आहे. नौदलाच्या विमानाचे सारथ्य करणारी पहिली वैमानिक होण्याचा मान शुभांगी स्वरूप या उत्तर प्रदेशातील २० वर्षांच्या तरुणीला मिळाला आहे.येथून जवळच असलेल्या एझिमला नौदल अकादमीत नव्याने प्रशिक्षित कॅडेट््सचा दीक्षांत समारंभ पार पडला. प्रशिक्षण काळात दाखविलेल्या तयारीच्या जोरावर शुभांगी स्वरूप हिची वैमानिक शाखेसाठी निवड झाली. (वृत्तसंस्था)>पहिलीच वैमानिक...नौदलाच्या दक्षिण कमांडचे प्रवक्ते कमांडर श्रीधर वारियर म्हणाले की, हवाई वाहतूक नियंत्रक व विमानातील दळणवळण व शस्त्रास्त्र यंत्रणेवर लक्ष ठेवणाºया ‘निरीक्षक’ म्हणून महिला याआधीपासून नौदलाच्याहवाई शाखेत काम करीत आहेत. परंतु महिलेची वैमानिक म्हणून निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.शुभांगीचे वडील ज्ञान स्वरूप नौदलात कमांडर आहेत. या निवडीने शुभांगी व तिच्या वडिलांची जणू स्वप्नपूर्ती झाली आहे.इतर सेवांतही आता महिलायाखेरीज नौदलाच्या सेवेत इतकी वर्षे केवळपुरुष काम करीत असलेल्या आणखी एका शाखेतही महिलांनी प्रथमच प्रवेश मिळविला आहे.नौदलाच्या शस्त्रभांडाराची तपासणी आणि निगराणी करणारे निदेशनालय असे या शाखेचेनाव आहे.एझिमला अकादमीतून बाहेर पडलेल्या नव्या तुकडीतील आस्था सेहगल (दिल्ली), रुपा ए. (पुद्दुचेरी) आणि शक्ती माया एस. (केरळ) या तिघींची या शाखेसाठी निवड झाली आणि महिलांनी कतृत्वाचे आणखी एक नवे क्षेत्रकाबिज केले.>हैदराबाद येथील हवाई दल अकादमीत अधिक प्रगत प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शुभांगी नौदलाच्या टेहळणी विमानाचे सारथ्य करेल.- कमांडर श्रीधर वारियर, नौदलाच्या दक्षिणकमांडचे प्रवक्ते
कर्तृत्वाला नवे पंख; पहिली महिला वैमानिक नौदलातही घेणार भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 4:19 AM