- अनिल भापकर, औरंगाबाद‘व्हॉट्स अॅप’ सध्या जगातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेंजर अॅप आहे. आपल्या युझर्सला नेहमी नवनवीन फिचर्स देत असल्याने व्हॉट्सअॅप युझर्सची संख्या वाढतच आहे. आता व्हॉट्सअॅपने त्यांच्या युझर्सला अजून एक नवीन फिचरची भेट दिली आहे. या नवीन फिचरचे नाव आहे ‘कोट अॅण्ड रिप्लाय.’या नवीन फिचरमुळे तुम्हाला एखाद्या व्हॉट्सअॅप मेसेजला रिप्लाय करायचा असल्यास त्या मेसेजवर लाँग क्लिक केल्यास वरील बाजूस रिप्लाय बटन येते म्हणजे त्यावर क्लिक केल्यावर त्या मेसेजसह तुम्ही रिप्लाय केलेला मेसेज पाठवता येतो. म्हणजे पूर्वी तुम्हाला ग्रुपवर एखाद्या विशिष्ट मेसेजला रिप्लाय करायचा असल्यास तुम्हाला तो मेसेज पोस्ट करणाऱ्याचे नाव लिहून मग त्यावर रिप्लाय करावा लागे. आता मात्र तुम्हाला ज्या विशिष्ट मेसेजला रिप्लाय करायचा आहे त्या मेसेजसह रिप्लाय करू शकता. हे फिचर वन-टू-वन तसेच व्हॉट्सअॅप ग्रुपमध्येसुद्धा काम करते.
‘व्हॉट्स अॅप’चे नवीन फिचर
By admin | Published: June 12, 2016 1:53 AM