शहरं
Join us  
Trending Stories
1
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
2
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
3
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
5
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
6
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
7
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
8
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
9
अदानी मुद्द्यावर 'इंडिया आघाडीत' फूट? टीएमसीने काँग्रेसला फटकारले
10
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
11
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
12
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
13
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
14
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
15
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...
16
अखेर विकी कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट जाहीर! २०२५ मध्ये या खास दिवशी रिलीज होणार सिनेमा
17
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
18
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
19
Finally Divorced... ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटाला 2 वर्षानंतर कोर्टाकडून मान्यता
20
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी

नव्या तंतुमय अस्तरामुळे निम्म्या खर्चात डायलिसिस शक्य

By admin | Published: November 22, 2014 2:16 AM

हे रुग्णांसाठी अधिक सुरक्षित तर असेलच, शिवाय यातूनच पुढे कुठेही नेता येऊ शकणा्नरे (पोर्टेबल) व रुग्णाला स्वत:सोबत वागविता येईल असे (वेअरेबल) डायलिसिस यंत्र विकसित करणेही शक्य होणार आहे.

नवी दिल्ली : मूत्रपिंडे निकामी झालेल्या रुग्णांना अपरिहार्यपणे कराव्या लागणाऱ्या डायलिसिस उपचारांसाठी मुंबई आयआयटीच्या वैज्ञानिकांनी एक अभिनव ‘पोकळ तंतुमय अस्तर’ (हॉलो फायबर मेम्ब्रेन) विकसित केले असून त्याचा वापर केल्याने डायलिसिससाठी येणारा खर्च व लागणारा वेळ निम्म्याने कमी होऊ शकणार आहे. हे रुग्णांसाठी अधिक सुरक्षित तर असेलच, शिवाय यातूनच पुढे कुठेही नेता येऊ शकणा्नरे (पोर्टेबल) व रुग्णाला स्वत:सोबत वागविता येईल असे (वेअरेबल) डायलिसिस यंत्र विकसित करणेही शक्य होणार आहे.मुंबई आयआयटीच्या रासायनिक अभियांत्रिकी विभागातील संशोधकांनी हे पोकळ तंतूमय अस्तर विकसित केले आहे. डायलेसिस यंत्रातील फिल्टरमध्ये होणाऱ्या गाळप प्रक्रियेसाठी हे अस्तर वापरले की त्यामुळे रक्त शुद्धिकरणाचे काम अधिक वेगाने, कमी खर्चात होऊ शकेल व याचे रुग्णावर होणारे दुष्परिणामही तुलनेने कमी असतील, असे या संशोधन गटाचे प्रमुख जयेश बेल्लारे यांनी सांगितले.हे अस्तर वापरून हेमोडायलिसिस केले की रक्तातील अशुद्ध द्रव्ये विलग करण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षमतेने व नैसर्गिकरीत्या होऊ शकते. परिणामी डायलिसिससाठी लागणारा वेळ वाचतो व साहजिकच खर्च ही कमी होतो, असेही वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. हेच सूत्र पकडून पुढे आणखी संशोधन केले तर भविष्यात मूत्रपिंड अथवा यकृताचे काम करू शकेल असा जैव-कृत्रिम अवयवतयार करणेही शक्य होईल, असेही बेल्लारे यांचे म्हणणे होते.या नव्या पोकळ तंतूमय अस्तराच्या प्रयोगशाळेतील चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्या असून आता प्रत्यक्ष उपचारपूर्व चाचण्या घेतल्या जायच्या आहेत. या उत्पादनासाठी भारतात ‘पेटन्ट’ घेण्यात आले असून या अस्तराच्या कमी खर्चात उत्पादनासाठी गेली दोन वर्षे एक पथदर्शी संयंत्रही चालविले जात आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)