मुंबई : शिवसेना आणि भाजपा या दोन पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी मंगळवारी चर्चा करून जागावाटपाचा १५० : १२४ : १४ असा परस्पर ठरविलेला नवा फॉर्म्युला आम्हाला मान्य नसल्याचे महायुतीतील घटक राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी सांगितले.भाजपाने गेल्या वेळेपेक्षा अधिक जागा मागितल्यामुळे जागावाटपाचा तिढा निर्माण झाला. दोन दिवस दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यासारखे वक्तव्ये केली. परंतु मंगळवारी दोन्ही पक्षांचे नेते एकत्र आले आणि त्यांनी भाजपा-शिवसेनेचा इतक्या वर्षाचा घरोबा तुटणार नसल्याचे सांगितले.१२० पेक्षा अधिक जागा भाजपाला पाहिजे असल्यास त्या मित्रपक्षांच्या कोट्यातून द्याव्यात, या प्रस्तावावर परस्पर चर्चा केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, रिपाइंचे नेते रामदास आठवले आणि रासपाचे नेते महादेव जानकर यांनी नाराजी व्यक्त केली. भाजपा-सेनेला न मिळणारी मते आमच्यामुळे लोकसभेला मिळाली. जागावाटपात अन्याय सहन केला जाणार नाही, असेही जानकर म्हणाले.
महायुतीचा नवा फॉर्म्युला अमान्य
By admin | Published: September 24, 2014 4:21 AM