शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
5
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
6
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
7
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
8
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
9
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
10
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
11
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
12
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
13
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
14
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
15
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
16
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
17
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
18
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
19
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका

गुणवत्ता असलेली नवी पिढी बलशाली भारत घडवील : सुमित्राताई महाजन

By admin | Published: July 09, 2016 2:37 AM

भविष्यात तुमच्यासारखी मुले या क्षेत्रात आली तर बलशाली भारताचे स्वप्न साकार होऊ शकेल, असे प्रतिपादन लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांनी लोकमत बाल विकास मंच

नवी दिल्ली : भविष्यात तुमच्यासारखी मुले या क्षेत्रात आली तर बलशाली भारताचे स्वप्न साकार होऊ शकेल, असे प्रतिपादन लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांनी लोकमत बाल विकास मंच व कॅम्पस क्लबच्या वतीने राजधानी दिल्लीत हवाई सफरीने आलेल्या ५0 शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले. या सफरीत सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनींच्या आयुष्यातला हा संस्मरणीय प्रसंग होता.लोकसभा सचिवालयाच्या सभागृहात सुमित्रातार्इंशी विद्यार्थ्यांनी जवळपास ४५ मिनिटे मराठीत संवाद साधला. नागपूर आणि मुंबईहून विमानाने दिल्लीत दाखल झालेल्या या विद्यार्थ्यांच्या पथकाचे सारथ्य लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी.बी. चांडक यांनी केले. विद्यार्थ्यांनी या वेळी स्त्री-पुरुष समानता आणि लिंगभेदाची समस्या, भ्रष्टाचाराचा भस्मासूर, मुले व महिलांवरील अत्याचार, बालकामगारांच्या समस्या अशा विषयांसह आपण लोकसभा अध्यक्षपदापर्यंत कशा पोहोचल्या, असे अनेक प्रश्न सुमित्रातार्इंना विचारले. विद्यार्थ्यांची विषयांची निवड आणि प्रश्नांची गुणवत्ता ऐकून त्याही थक्क झाल्या. चिपळूणमधील जन्मापासून, सुमित्रातार्इंनी आपल्या आवडीनिवडी, महाविद्यालयीन शिक्षण, वैवाहिक जीवन, सामाजिक व सार्वजनिक उपक्रमात सहभाग, नगरसेवक, उपमहापौर, खासदार मंत्री ते लोकसभा अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास, याची छोटीशी गोष्ट सांगताना वक्तृत्वकला आणि वाचनाच्या आवडीचा कसा उपयोग झाला, याचा उल्लेख केला. मेहनत, चिकाटी, जिद्द आणि प्रामाणिकपणा या ४ गुणांमुळेच मी इथपर्यंत पोहोचले, असे त्या म्हणाल्या.लिंगभेदाचे प्रमाण पूर्वीइतके आता राहिलेले नाही. शिक्षणाचे प्रमाण वाढले, ुसंस्काराची आठवण ठेवून प्रत्येक जण वागल्यास मुली व महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी होईल. स्त्री ही अधिक सोशिक व समजदार असते. मातृत्व, दातृत्व व कर्तृत्व ही स्त्री जन्माची बंधने नव्हेत, तर आभूषणे आहेत, असे एका प्रश्नावर त्या उत्तरल्या. संस्कार विसरणारे भ्रष्टाचाराच्या आहारी जातात. अनेकदा कुटुंबातले सदस्यही अपप्रवृत्तीला जबाबदार असतात. आपले आईवडील प्रसंगी उपाशी राहून आपल्याला शिकवतात. प्रत्येक लाड पुरवतात. त्यांच्याकडे मोबाइलसाठी हट्ट धरणे योग्य नाही. शाळेत गुरूजन आपल्या ज्ञानात भर घालतात. आई-वडिलांसह गुरूजनांची शिकवण आणि संस्कार आपण कधी विसरता कामा नये. घरात वेगळ्या मार्गाने पैसा येत असेल तर त्याला विरोध केला पाहिजे, असा सल्ला सुमित्रातार्इंनी दिला.सातवीतल्या विद्यार्थ्याने बालकामगारांच्या समस्यांविषयी प्रश्न विचारला असता आश्चर्यचकित झालेल्या तार्इंनी तुला या समस्येची माहिती कशी मिळाली, असा प्रतिप्रश्न केला. तेव्हा वृत्तपत्रातल्या बातम्या वाचून हा प्रश्न मला कळला, असे उत्तर त्याने दिले. त्यावर ताई म्हणाल्या, बालकामगारांच्या समस्यांबाबत बारकाईने विचार होत असून, लवकरच ही समस्या नष्ट होईल, असा मला विश्वास वाटतो. मुलांचे लक्षवेधी प्रश्न आणि त्यावर तार्इंनी साधलेला संवाद हा सारा प्रसंगच आनंददायी होता. लोकसभाध्यक्षांनी संसदेचे चित्र असलेले घड्याळ आणि पुस्तक भेट देऊन प्रत्येक विद्यार्थ्याचे कौतुक केले. प्रत्येक विद्यार्थ्याची आस्थेने विचारपूस केली आणि मनसोक्त छायाचित्रेही काढली. लोकमतच्या वतीने याप्रसंगी बी.बी. चांडक यांनी सुमित्रातार्इंचा सत्कार व आभार प्रदर्शन केले. लोकमत बालविकास मंचचे दीड लाख सदस्य आहेत तर लोकमतच्या सखी मंचच्या २ लाखांहून अधिक सदस्या आहेत. या दोन्ही संस्थांतर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही याप्रसंगी चांडक यांनी दिली.या सोहळ्याला लोकसभेचे महासचिव अनुप मिश्रा, अपर सचिव के. विजयकृष्णन, उपक्रमाचे संयोजक नितीन नोकरकर, लोकमतचे राष्ट्रीय संपादक हरीश गुप्ता आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)लोकमत बालविकास मंच आणि कॅम्पस क्लबच्या विद्यार्थी सदस्यांची केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनीही शास्त्री भवनातल्या आपल्या कार्यालयात भेट घेतली. त्यांनी विद्यार्थ्याचे मनापासून कौतुक करीत त्यांच्यासोबत ग्रुप फोटोही काढले. या सहलीत विद्यार्थ्यांनी इंडिया गेट, इंदिरा गांधी स्मृती संग्रहालय, ३० जनवरी मार्गावरील महात्मा गांधी स्मृती स्थळ, नेहरू तारांगण आदी स्थळांनाही भेटी दिल्या.