पश्चिम बंगालमधील आरजी कर रुग्णालयाच्या अडचणीत वाढ झाली आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या एका एका मुलावर ३ तास उपचारच केले नसल्यामुळे त्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. या मुलाचे नाव बिक्रम भट्टाचार्जी असं आहे, त्याचे वय २८ आहे. तरुणाच्या मृत्यूवरून पश्चिम बंगालमध्ये सध्या खळबळ उडाली आहे. ट्रकने धडक दिल्यानंतर त्याला शुक्रवारी कोलकाता येथील आरजी कर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला.
'जॉइंट प्लॅटफॉर्म ऑफ डॉक्टर्स' आंदोलनामुळे राज्याच्या आरोग्य विभागाला कोलकात्यातील पाचही वैद्यकीय महाविद्यालयांमधील हेल्प डेस्क बंद करावे लागल्यानंतर ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हुगळीच्या कोननगर येथील तरुणाला जखमी अवस्थेत आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आले. रुग्णालयात उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपमध्ये तिसऱ्या दिवशीही राजीनामे थांबेनात; 72 नेत्यांचा पक्षाला रामराम
या घटनेवरून तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी रुग्णालय प्रशासनावर निशाणा साधला आहे. टीएमसी खासदार कुणाल घोष यांनी सांगितले की, बिक्रम भट्टाचार्जी यांना उपचार मिळाले नाहीत, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मात्र, हे आरोप रुग्णालयाने फेटाळून लावले आहेत. बिक्रम भट्टाचार्जी यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाविरोधात कोणतीही पोलिस तक्रार दाखल केलेली नाही. सामान्य नोंदी डायरी बनवण्यात आल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये सांगितले जात आहे.
टीएमसीचे खासदार आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली. पोस्टमध्ये म्हटले की,'कोणनगर येथील एका तरुणाचा रस्ता अपघातात जीव गमवावा लागला. ३ तास रक्तस्त्राव सुरू होता पण उपचार झाले नाहीत. आरजी कर घटनेला डॉक्टरांचा विरोध आहे. कनिष्ठ डॉक्टरांच्या मागण्याही रास्त आहेत. परंतु, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा विस्कळीत होऊ नयेत, अशा पद्धतीने आंदोलन करण्याचे मी त्यांना आवाहन करतो.