ऑनलाइन लोकमत -
मध्यप्रदेश, दि. 28 - उज्जैनमध्ये लग्नाचं सेलिब्रेशन करण्यासाठी करण्यात आलेल्या फायरिंगमध्ये नव-यामुलाच्या वडिलांचाच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाचं सेलिब्रेशन करण्यासाठी फायरिंग करताना चुकून सुटलेली गोळी समोर उभ्या असलेल्या नव-यामुलाच्या वडिलांनाच लागली आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. 27 मार्चची ही घटना आहे.
व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे नव-यामुलाचे वडीलच स्वत: फायरिंग करण्यासाठी सर्वांना सांगत आहे. मात्र या फायरिंगमध्ये आपलाच मृत्यू होईल याची त्यांना कल्पनाही नसावी. नव-यामुलाच्या वडिलांना गोळी लागल्याचं सुरुवातीला कोणाच्या लक्षातच आलं नाही. ज्याच्या बंदुकीतून गोळी सुटली त्यालादेखील काय झालं कळलं नव्हतं. गोळी डोक्याला लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत झालेली व्यती नव-यामुलाचा वडील असल्याचं लक्षात आल्यानंतर सोहळ्याचं रुपांतर दुखात झालं.
उत्तर भारतात लग्नादरम्यान फायरिंग करणं ही तशी प्रथाच झाली आहे. लग्नामध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित असतानादेखील अशाप्रकारे फायरिंग केली जाते. अशाप्रकारे करण्यात आलेल्या फायरिंगमध्ये मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. लग्नामध्ये मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि विना परवाना शस्त्र बाळगली जातात. मात्र तरीही अशा घटनांवर नियंत्रण येऊ शकलेलं नाही.