देशाच्या नव्या संसद भवनाचा उद्घाटन सोहळा रविवार २८ मे रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अधिनम बंधूंची भेट घेतली. यावेळी अधिनम संतांनी पंतप्रधानांकडे ऐतिहासिक सेंगोल सुपूर्द केला. हा सेंगोल तामिळ परंपरेनुसार रविवारी भारताच्या नव्या संसद भवनामध्ये स्थापित करण्यात येईल.
ऑगस्ट १९४७ रोजी सत्ता हस्तांतरणाचं प्रतीक म्हणून तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडे हा राजदंड (सेंगोल) सुपूर्द करण्यात आला होता. पुढे होता तो अलाहाबाद संग्रहालयात ठेवण्यात आला होता. आता नव्या संसदेत स्थापित करण्यासाठी तो दिल्लीमध्ये आणण्यात आला आहे. ५ फूट लांब आणि आणि ८०० ग्रॅम वजनाचा हा सेंगोल न्यायाचं प्रतीक आहे. तामिळ परंपरेमध्ये सेंगोलचा अर्थ संपदेने संपन्न असा होतो. त्याच्या शीर्षस्थानी नंदीची प्रतीमा आहे.
चांदीपासून बवण्यात आलेला आणि वर सोन्याचा मुलामा दिलेला हा ऐतिहासिक सेंगोल २८ मे रोजी लोकसभा अध्यक्षांच्या शेजारी स्थापित करण्यात येईल. १९४७ रोजी या मठाचं संचालन अंबालावनदास देसिका परमाचार्य स्वामी यांच्या हातात होता. तसेच स्वातंत्र्य आणि हस्तांतरणाचं प्रतीक म्हणून एका सेंगोलची निर्मिती करण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला होता.