शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

तामिळनाडूत नवा राजकुमार एम.के. स्टॅलिन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 01:58 IST

तामिळनाडूच्या राजकारणातील दोन प्रमुख नेते आणि माजी मुख्य मंत्री एम. करुणानिधी आणि जयललिता यांच्या निधनानंतर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत एम.के. स्टॅलीन यांनी बहुमत मिळवत द्रमुकचे प्रमुख आपणच असल्याचे सिद्ध करून दाखवले.

वसंत भोसले चौपन्न वर्षांनंतरदेखील तामिळनाडूचे राजकारण द्रविडियन चळवळीतून उभ्या राहिलेल्या राजकीय ताकदीचा पुन्हा एकदा विजय झाला आहे आणि त्याचा नवा राजकुमार द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे सर्वेसर्वा एम.के. स्टॅलीन असणार आहेत, हे रविवारी जाहीर झालेल्या विधानसभेच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.

तामिळनाडूच्या राजकारणातील दोन प्रमुख नेते आणि माजी मुख्य मंत्री एम. करुणानिधी आणि जयललिता यांच्या निधनानंतर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत एम.के. स्टॅलीन यांनी बहुमत मिळवत द्रमुकचे प्रमुख आपणच असल्याचे सिद्ध करून दाखवले. सलग दोन वेळा सत्तेत असलेल्या अण्ण्णाद्रमुक सरकारविरोधात जनतेत तीव्र नाराजी होती, तसेच माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर पक्षात मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम, असे दोन गट झाले होते. त्याचा परिणाम सरकारच्या निर्णय क्षमतेवर झाला होता. २०१७ मध्ये अपघाताने मुख्यमंत्री झालेल्या पलानीस्वामी यांचे सरकार काही दिवसांत कोसळेल, असे अनेकांचे मत होते; पण पलानीस्वामी यांनी केंद्र सरकारच्या मदतीने आपला कार्यकाळ पूर्ण केला.

पलानीस्वामी यांचे सरकार केंद्रातील मोदी सरकारच्या हातातील कटपुतळी असून, मोदी सरकार तामिळविरोधी आहे, ही जनभावना तयार करण्यात द्रमुकला यश आले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३९ पैकी ३८ जागा जिंकत द्रमुकने घोडदौड सुरू केली होती. लोकसभेच्या निकालापासून स्टॅलीन यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती. २०१६ मध्ये अवघ्या काही जागांमुळे सत्ता गमावावी लागल्याने यावेळी कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायचीच, असा चंग त्यांनी बांधला होता. २०१६ च्या निवडणूक निकालावर करुणानिधी यांची छाप होती. त्यांच्या बळावर मिळालेली सत्ता नको म्हणून स्टॅलीन यांनी तामिळनाडूमध्ये मध्यंतरी सत्ता स्थापन करण्याची संधी असतानाही  पलानीस्वामी सरकारला कोणताही धक्का लावला नाही. स्वकर्तृत्वावर सत्ता मिळवत अंतर्गत व बाहेरील विरोधकांना आपली शक्ती दाखविण्यासाठी त्यांनी पाच वर्षे प्रतीक्षा केली. करुणानिधींच्या निधनानंतर कौटुंबिक वादांवर मात करत द्रमुकची सूत्रे आपल्या हातात घेतली.

जनतेचा विश्वास कमावलाअण्णाद्रमुककडे जयललिता यांच्यानंतर जननेता नव्हता. पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम यांचे नेतृत्व मयादित होते, तर स्टॅलीन राज्यव्यापी नेते होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदीविरोधाची भूमिका पकडत ते पुढील दोन वर्षे त्यावर काम करत राहिले. जलिकट्टू, नीट परीक्षा, तामिळ अस्मितेचा मुद्दा उचलत केंद्रविरोधात तामिळ जनता, असा संघर्ष त्यांनी तीव्र केला होता. द्रविडी राजकारणावर राष्ट्रीय पक्षाचे राजकारण थोपले जात असल्याचे त्यांनी तामिळ मतदारांना पटवून दिले. त्याचा परिणाम निकालातून दिसून येत आहे.

स्वबळावर मुुख्यमंत्रिपद मिळवणारनिवडणुकीआधीपासून केलेली तयारी, घटक पक्षांना काही जागा देत टाळलेली मतविभागणी आणि प्रचाराची सर्व सूत्रे आपल्या हातात ठेवण्याचा फायदा स्टॅलीन यांना झाला. त्याचप्रमाणे नोटाबंदीनंतर राज्यातील उद्योगधंद्यांची झालेली दुरवस्था, अण्णाद्रमुकने भाजपसोबत केलेली आघाडी, कोरोना काळात मोदी सरकारची कामगिरी याचा परिणाम निवडणूक निकालावर दिसून येतो. करुणानिधी असताना स्टॅलीनना नेहमी त्यांच्या छायेत वावरावे लागत होते; पण त्यातून बाहेर पडत स्वबळावर सत्तेत येण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूElectionनिवडणूक